अमरनाथ येथील अतिरेकी हल्ल्याचा म्हसळा तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे जाहीर निषेध....

अनंतनाग येथे अमरनाथ यात्रेसाठी जाणाऱ्या गुजरात व महाराष्ट्रातील भाविकांवर आतंकवादी यांनी भ्याड हल्ला केला. तरी त्या हल्ल्याचा म्हसळा तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे जाहीर निषेध केला व त्यांच्यावरती कठोर कारवाई व्हावी. असे निवेदन राष्टावादी काँग्रेस पक्षातर्फे म्हसळा तहसीलदार साहेबांना देण्यात आले.

तरी यावेळी उपस्तिथ म्हसळा तालुका अध्यक्ष नाझीम हस्वारे, नगराध्यक्षा कविता बोरकर, उपनगराध्यक्ष नासिर दळवी, उपसभापती मधुकर गायकर, तसेच संदीप चाचले, सुरेश जैन, खापरे मॅडम, संतोष पाखंड, सतीश शिगवण , किरण पालांडे , अशोक काते, श्रीकांत बिरवाडकर , व इतर कार्यकर्ते यावेळी उपस्तिथ होते.

Post a Comment

Previous Post Next Post

नक्की वाचा