मान्सूनपूर्व पाऊस बरसल्यानंतर नागरिकांची प्लास्टिक कापड दूकानात गर्दी

मान्सूनपूर्व पाऊस बरसल्यानंतर  नागरिकांची प्लास्टिक कापड दूकानात गर्दी



म्हसळा : सुशील यादव
पावसाळा आला की रेनकोट , छत्रीच्या दुकानात दरवर्षी आपण गर्दी करत असतो . परंतू आजकाल शेतीच्या कामासाठी , घराच्या गळक्या छपरांसाठी , खिडकीसाठी , पडवीसाठी , सिमेंट झाकण्यासाठी , दुचाकी -चार चाकी , ट्रॅक्टर, ट्रक इ . वाहने झाकण्यासाठी प्लास्टिक  कापडाचा मोठ्या प्रमाणावर वापर होण्यास सुरुवात झाली आहे . त्यामुळे रेनकोट , छत्री सोबतच प्लास्टिक खरेदीसाठी देखील नागरिकांची विशेषतः कोकणातील नागरिकांची प्लास्टिक कापड दुकातात मोठी झुंबड पहावयास मिळत आहे . आमच्या प्रतिनिधीनी मनिष जैन या म्हसळा शहरातील अशाच एका कापड विक्रेत्यास याबाबत विचारले असता त्यांनी सांगीतले की मागील वर्षी सरासरी पावसाचे प्रमाण हे इतर वर्षांपेक्षा अधीक होते. त्यामुळे मुसळधार पावसाने छत गळणे , घरात पावसाच्या पाण्याची झड मारणे इत्यादी त्रास लोकांना पावसाची पूर्व तयारी न झाल्यामूळे सहन करावा लागला . हेच कारण आहे की या वर्षी प्लास्टीक कापड दूकानात मोठया प्रमाणात गर्दी पहावयास मिळत आहे .

छाया : सुशील यादव

Post a Comment

Previous Post Next Post

नक्की वाचा