संतोष पाखड 'युवा सामाजिक' पुरस्काराने सन्मानित...

संतोष पाखड 'युवा सामाजिक' पुरस्काराने सन्मानित...

म्हसळा (बाबू शिर्के)

     म्हसळा तालुक्यातील कांदळवाडा येथील कुणबी समाज तालुका युवा अध्यक्ष, शिवसेना विभागप्रमुख संतोष पाखड यांना रोहा येथे  दसबा फाऊंडेशनच्या ‘युवा सामाजिक पुरस्कार 2017’ने नुकतेच राजीप अध्यक्ष आदिती तटकरे यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले.यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून अनिकेत तटकरे, नगराध्यक्ष संतोष पोटफोडे, सभापती सौ वीणा चितळकर, उपसभापती विजया पाशीलकर, महेंद्र पोटफोडे, दसबा फौंडेशन चे अध्यक्ष महेश बामुगडे, उपाध्यक्ष गणेश बामुगडे, प्रकाश साळुंखे आणी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
     मागील अनेक वर्षे संतोष पाखड हे सामाजिक, क्रीडा क्षेत्रात म्हसळा तालुक्यातील युवकांना मदत करीत आहे.त्यांचा या कार्याची दखल घेऊन त्यांना हा पुरस्कार जाहीर करण्यात आला असे दसबा फाऊंडेशन चे अध्यक्ष महेश बामुगडे यांनी सांगितले.यावेळी अनिकेत तटकरे यांनी आपल्या भाषणात संतोष पाखड आणी मी भविष्यात एकत्र काम करू असे भाकीत वर्तीवले. सदर पुरस्कार संतोष पाखड यांना जाहीर झाल्याबद्दल म्हसळा तालुका कुणबी समाज अध्यक्ष श्रीपत धोकटे, कांदळवाडा सरपंच पांडुरंग बने, समीर बनकर, शिवसेना तालुका प्रमुख नंदू शिर्के यांनी अभिनंदन केले.

Post a Comment

Previous Post Next Post

नक्की वाचा