सक्तीचा शिक्षणाचा अधिकार अधिनियम (RTE) 2009 अंतर्गत 25% आरक्षणामधून प्रवेश घेण्यासाठीची प्रक्रीया रायगड जिल्ह्यात राबविण्यात आली होती. यात बहूतांश शाळेत 25% प्रवेशाच्या 5 फेऱ्या पूर्ण करुनही काही पदे रिक्त आहेत. त्यामुळे पालकांना पाल्याचे प्रवेशाचे नविन अर्ज भरण्यासाठी दि.30 जून 2017 पर्यंत मुदतवाढ देण्यात आले आहे.
पालकांनी संबंधित तालुक्यांतील गट शिक्षणाधिकारी यांचे कार्यालयाशी संपर्क साधून प्रवेशाचे नवीन अर्ज भरावेत. असे आवाहन शेषराव बडे, शिक्षणाधिकारी (प्राथमिक) यांनी केले आहे.
Post a Comment