रायगड जिल्हा परिषद प्राथमिक शाळा भापट शाळेची एकुण शैक्षणिक गुणवत्ता व प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र अंतर्गत शाळेचा चांगला दर्जा पाहता भापट ग्रामस्थांच्या सहकार्याने आणि लोकवर्गणीतून विद्यार्थ्यांना खेळाचे साहित्य , झोपाळा, घसरगुंडी, शिसाॅ इत्यादी वस्तू देण्यात आल्या.या कार्यासाठी समाज सेवक निळेश गोणबरे, काशिम मेमन , ओम शिव सत्य क्रिकेट संघ भापट, पाणी कमेटी भापट आणि ग्रामस्थ मंडळ भापट यांच्या सहकार्याने हे सर्व साहित्याचे नियोजन करून शाळेस भेट देण्यात आले . या प्रसंगी मंडळाचे अध्यक्ष प्रवीण ठोंबरे साहेब, पोलीस पाटील मुक्तार नजिर, रविंद्र कुवारे उपसरपंच गजानन पाष्टे साहेब, लक्ष्मण मोहिते, पांडुरंग जाडे, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष भाविका जोशी, रंजिता कुवारे, ग्रा पं सदस्या दृष्टी अलिम, मुख्याध्यापिका चव्हाण मॅडम, महिला मंडळ अध्यक्षा रविना घडशी, उपाध्यक्ष रूचिता कांदेकर, सदस्या रसिका अलिम, विजया जोशी, राजेश्री बेटकर, गंगाबाई जोशी आदि मान्यवर सदस्य उपस्थित होते.
या उपक्रमासाठी भापट मुंबई मंडळाचे अध्यक्ष रघुनाथ कांदेकर, सेक्रेटरी रामचंद्र कुवारे व क्रिकेट संघाचे कर्णधार महेश घडशी व खेळाडू यांनी अथक परिश्रम घेतले.
Post a Comment