मोडकळीस एक वर्ष होवुन देखील दुरुस्ती नाही , एकाच वर्गात सर्व विद्यार्थी, रायगड जिल्हा परिषदेचे दुर्लक्ष
म्हसळा : सुशील यादव
महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री बॅ .ए.आर. अंतुले यांच्या मुळ गावी म्हणजेच म्हसळे तालुक्यातील आंबेत रा .जि.प.शाळेचे मागील वर्षी जुलै महीन्यात वादळी पावसामुळे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले होते .मोडकळीस एक वर्ष होवुन देखील या शाळेची अद्याप दुरुस्ती करण्यात आलेली नाही. नाईलाजास्तव एकाच वर्गात सर्व वर्गाचे विद्यार्थी बसविले जातात . शाळेचे तुटलेले छत,तडे गेलेल्या भिंती ही अवस्था असताना देखील रायगड जिल्हा परिषदेने जर वर्षभरात आंबेत सारख्या महाराष्ट्राच्या माजी मुख्यमंत्र्यांच्या गावात लक्ष दिले नाही तर तालूक्यातील दूर्गम भागातील खेडेगावांचे काय होणार ?असा सवाल आंबेतवासी विचारत आहेत . एकीकडे शिक्षणात जिल्हा परिषदेच्या शाळेचा टक्का घसरुन खाजगी शाळांचे पेव फुटले आहे त्यात शाळांची अशी अवस्था यामुळे ग्रामीण शिक्षण व्यवस्थेकडे पाहण्याचा जि.प. प्रशासनाचा उदासीन दृष्टीकोन स्पष्ट होतोय.
म्हसळे तालुक्यात रा.जि.प.च्या 110 शाळा आहेत . त्यातील आंबेत शाळेची वर्षभरापूर्वी अशी दुरावस्था झाली मात्र प्रशासनाने याकडे दुर्लक्ष केले आहे.या शाळेच्या छपराचे नुकसान मागील वर्षीच्या जुलै महिन्याच्या अतीवृष्टीत होऊन संपुर्ण भिंतीना तडे गेले आहेत. याबाबतीत या शाळेच्या शालेय व्यवस्थापन समितीने अनेकदा तक्रार केली आहे तरीही प्रशासनाने याकडे डोळेझाक केली आहे.
जि.प.शाळा गुणवत्तेच्या निकषावर पुढे येत आहेत तर काही शाळा ई-लर्निग व डिजीटल व स्पर्धात्मक शाळा होत असताना दुर्गम भागातील शाळांच्या या दुरावस्थेची जबाबदारी कोणाची ? हा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे.म्हसळा तालुक्यात पावसाचे प्रमाण अधिक असुन शाळा व पावसाळा एकाचवेळी सुरु होवुन सुद्धा दुरावस्था झालेल्या या शाळेची दुरुस्तीची हालचाल नसल्याने पाऊस झेलत विद्यार्थ्यांना शिक्षण घ्यावे लागणार आहे हे जिल्ह्यातील शिक्षण व्यवस्थेची अनास्थाच म्हणावी लागेल .
आंबेत जि.प. शाळेचे नुकसान झाल्यानंतर लगेचच शाळेच्या दुरावस्थे बाबतीचा अहवाल "सर्व शिक्षा अभियान " विभागाने नेमलेल्या अभियंत्याकडून तयार करून घेऊन दूरूस्तीच्या निधीसाठी जिल्हा परिषदे कडे पाठविला आहे . परंतू अजूनही या दुरुस्तीला मंजूरी मिळालेली नाही .
गजानन साळूंखे , गटशिक्षण अधिकारी , म्हसळा
"नविन शैक्षणिक वर्षात नव्या उत्साहाने विद्यार्थ्यांचे स्वागत केले जाते त्याच प्रमाणे शैक्षणिक गुणवत्ता वाढीसाठी रा.जि.प.कटीबद्ध असताना दुरवस्था झालेल्या या शाळेचे अद्यापही जि.प.कडुन सर्वेक्षण झालेले नाही" जर येत्या आठ दिवसात आंबेत शाळेच्या दुरुस्तीला मंजूरी मिळाली नाही तर म्हसळा तालूका कॉंग्रेस कडून आंदोलन करण्यात येईल .
डॉ . मोईझ शेख , काँग्रेस नेते , म्हसळा तालुका
दुरुस्तीसाठी चार वेळा प्रस्ताव जि.प. कडे पाठवून झाले ही चिंताजनक बाब आहे परंतु आता जि.प. कडे पाठविलेले प्रस्ताव लागलीच मंजुर करुन घेण्यासाठी रा . जि.प. अध्यक्षा अदिती तटकरेंशी संपर्क करून शाळेचे काम पुर्ण होण्यापर्यंत स्वत: जातीने लक्ष घालणार.
मघुकर गायकर , उपसभापती,पं स. म्हसळा
Post a Comment