अलिबाग, क्रीडा व युवक सेवा संचालनालयाच्या अधिपत्याखालील शिवछत्रपती क्रीडापीठांतर्गत राज्यातील 11 क्रीडा प्रबोधिनीमध्ये ॲथलेटिक्स्, ज्युदो, शुटींग, सायकलींग, वेटलिफ्टिंग, हॉकी, जिम्नॅस्टिक्, फुटबॉल, कुस्ती, टेबल टेनिस, बॅडमिटन, जलतरण, धनुर्विद्या, हँडबॉल या खेळातील उद्यन्मुख खेळाडूंसाठी क्रीडा प्रबोधिनीच्या निवासी व अनिवासी प्रवेशाकरीता सरळ प्रवेश व खेळनिहाय चाचण्यांचे आयोजन राज्यस्तरावर करण्यात आले असून चाचण्या आयोजन प्रवेश पद्धतीनुसार आयोजनाचे वेळापत्रक पुढील प्रमाणे-
सरळ प्रवेश-खेळ प्रकार व राबविण्याचा अंतिम दिनांक व ठिकाण :-
ॲथलेटिक्स्, जलतरण, जिम्नॅस्टिक्, ट्रायथलॉन, ज्युदो, जिम्नॅस्टिक, सायकलींग, कुस्ती. बुधवार, दि.28, ठिकाण- शिवछत्रपती क्रीडा म्हाळुंगे,बालेवाडी पुणे.
हॉकी, फुटबॉल, हँडबॉल, बॅडमिटन, टेबल टेनिस, शुटींग, वेटलिफ्टिंग- गुरुवार, दि.29, ठिकाण- शिवछत्रपती क्रीडा म्हाळुंगे,बालेवाडी पुणे.
आर्चरी- गुरुवार दि.29 , ठिकाण-प्राचार्य,क्रीडा प्रबोधिनी विभागीय क्रीडा संकुल,अमरावती.
Post a Comment