वसंतराव नाईक महाविदद्यालयात "योग दिवस" साजरा
म्हसळा येथील कोकण उन्नती मित्र मंडळ संचलित वसंतराव नाईक कला व वाणिज्य महाविद्यालयात `आंतरराष्ट्रीय योग दिवस' निमित्ताने योग अभ्यासाकरीता व्याख्यान व प्रात्याशिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.योगासन करणे आपल्या शारीरिक दृष्टीकोनासाठी किती महत्वाचे आहे हे पटवून देण्यात आले.21 जून हा दिवस सर्वात मोठा दिवस असून योग विद्येत या दिवसाला विशेष महत्व आहे.175 देशांच्या संपतीसह सयुक्त राष्ट्र संघाने केवळ 90 दिवसात योग दिवस साजरा करण्यास मंजुरी दिली.या प्रसंगी महाविद्यालयामधे प्रा.एम.एम.जाधव,प्रा.डी.ए.टेकळे,कार्यक्रमाचे संयोजक प्रा.माशाळे,व्याख्याते हेमंत पयेर प्रा.बंदरकर,प्रा. डॉ.शिद्धिकी,प्रा.भोसले,प्रा.डॉ.बेंद्रे व शिक्षकेत्तर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते.
प्रा.माशाळे यांनी आपल्या प्रास्ताविकात योग दिनाचे महत्व व योगाचे फायदे,बदलती जीवन शैली व योगा या विषयी माहिती दिली.व आपल्या प्रात्याशिकामधे सर्व आसनांचा राजा म्हणून गणलेल्या शीर्षासनाचे प्रात्यक्षिक करुन दाखविले.कु.कोमल कांबळे हिने मधुमेह व उच्च रक्तदाब यावर उपयोगी असलेले सिद्धासन व वज्रासनाचे प्रात्यक्षिक करुन दाखवली.व्याख्यानकर्ते श्री हेमंत पयेर यांनी आपल्या व्याख्यानात योगाचे उगम व प्राचीन इतिहासाचे दाखले देत आजच्या पिढीला योगाचे महत्व पटवून दिले.प्राचार्य.जाधवसर यांनी आपल्या मनोगतात आजच्या युगातील सर्व वयोगटातिल व्यक्तिने योगासाठी वेळ देण्याची आवश्यकता आहे व याचा फायदा सर्वानी करुन घ्यावा असे आवाहन केले.या कार्यक्रमासाठी विद्यार्थी मोहन जाधव,कु.कोमल कांबळे,कु.माधवी पाटील अश्या अनेक विद्यार्थी वर्गांचा सहभाग लाभला.शेवटी प्रा.डॉ.बेंद्रे यांनी सर्वांचे आभार मानून कार्यक्रमाची सांगता केली.
Post a Comment