दोनदा भुमीपुजन झालेली म्हसळा नळपाणी पुरवठा योजना आजही मान्यतेच्या प्रतिक्षेत ....

दोनदा भुमीपुजन झालेली म्हसळा नळपाणी पुरवठा योजना आजही मान्यतेच्या प्रतिक्षेत 
येत्या उन्हाळयात म्हसळेकराना पाणी मिळेल ना? सामान्य जनतेचा सवाल 

म्हसळा : सुशील यादव

म्हसळा शहरासाठी नळपाणी पुरवठा योजनेचे पुनर् भूमीपूजन एप्रिल च्या २९ तारखेला विरोधी पक्षनेते आ.धनंजय मुढे यांच्या हस्ते तर नवनिर्वाचीत जिल्हा परिषद अध्यक्षा आदिती तटकरे , राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरे अन्य दिग्गज नेते यांच्या साक्षीने करुनही आजही सदर योजना  प्रशासकीय मान्यतेच्या प्रतिक्षेत आहे .  सद्यस्थितीत सदर योजनेच्या  प्रस्तावाची फाईल वाढीव रकमेसाठी मंत्रालयात धुळ खात पडली आहे . योजनेचे भूमिपूजन करून ५२ दिवस उलटले तरी देखील काम सुरू झाले नाही . सर्व सामान्य जनतेच्या डोळ्यात धुळ घालून ''  केवळ आम्ही जनतेसाठी काय तरी केलय" असा  आव आणणारे राष्ट्रवादीचे नेते सुनिल तटकरे व  कार्यकरते यांचे यानिमित्ताने चांगलेच पितळ उघडे पडले आहे .मुळात एकाच योजनेचे दोनवेळा भुमिपूजन करणारे  नेते सर्व सामान्य जनतेची सेवा कशी बर करतील? हेच समजत नाही . या आधीचे भुमीपुजन झालेल्या योजने अंतर्गत अंदाजे  रु १ कोटी ४७ लाख रक्कम मंजूर झाले होते.या मध्ये किमान रू १७लाख लोक वर्गणी जमा करणे होती.योजना २७ जानेवारी २०११ ला म्हसळा शहरात आली असून ती ती किमान १८ महिन्यांमध्ये पूर्ण करणे गरजेचे होते.या योजनेची वस्तुस्थिती व अध्यक्ष पाहता दिनांक १/२/२०१० ते ३०/५/२०१० पर्यंत श्री.यशवंत गोपाळ पवार(सरपंच राष्ट्रवादी), दिनांक ३१/०५/२०१० ते २०/०९/२०१२ पर्यंत श्री.अब्दुल सलाम हुसैन हुर्झुक(राष्ट्रवादी),०१/०६/२०१० ते ०७/०५/२०१३ पर्यंत उत्तम शांताराम पोतदार व ०८/०५/२०१३ ते २५/०५/२०१५ पर्यंत श्री.अब्दुल सलाम हुसैन हुर्झुक(राष्ट्रवादी) हे अध्यक्ष होते.योजनेचे सचिव पाहता ०१/०२/२०१० ते ०८/०५/२०१३ पर्यंत श्री.शीतल शांताराम बोरकर ( विद्यमान नगराध्यक्षा कविता बोरकर यांचे पती ) हे होते.योजनेचे ठेकेदार माय असोसिएट हे होते. उत्तम शांताराम पोतदार यांचा कार्यकाल वगळता अध्यक्ष व सचिवांच्या हलगर्जी पणामुळे  ठेकेदार ही योजना अपूर्ण सोडून गेले आणि म्हसळा नगरपंचायत झाल्यानंतर हीच योजना पुन्हा नवीन नावाने मंजूर करून आणून सुमारे १ कोटी ८५ लाखाच्या योजनेचे विधान परिषद विरोधी पक्ष नेते धनंजय मुंडे यांच्या हस्ते भूमिपूजन पार पडले हे म्हणजे तटकरेंच्या दांडग्या प्रशासकीय अनुभवाचा उत्तम नमुनाच म्हणावा लागेल.   केवळ भरगच्च कार्यक्रम करून ज्या कामाला प्रशासनाचा हिरवा कंदिल नाही असे असताना फुकटचे श्रेय घेण्याची घाई राष्ट्रवादी करत असल्याचा दावा पंचायत समिती माजी सभापती शिवसेना नेते महादेव पाटील यांनी आमच्या प्रतिनिधीशी बोलताना केला आहे ते  पुढे म्हणाले
आज पर्यंत सुनिल तटकरे यांनी सर्वच कामाचे भूमिपूजन घाईघाईने करून विकास कामाचा बोजवारा उडवून जनतेची फसवणूक केली आहे .आगामी काळात येणाऱ्या उन्हाळ्यात म्हसळयात टँकंरने पाणीपुरवठा करावा लागेल हे सत्य नाकाराता येत नाही . अजून कीती दिवस वाट पाहवी लागेल याची कल्पना न केलेलीच बरी !
चौकट
म्हसळा नळपाणी पुरवठा फाईल मंत्रालयात असून त्याचा पाठपुरावा सुरू आहे काहि दिवसातच प्रस्तावाला मंजूरी मिळेल . 
अदिती तटकरे, रा. जि.प. अध्यक्षा

चौकट
म्हसळा नळपाणी पुरवठा फाईल १६जून २०१६ ला पाठविली होती परंतू काही त्रूटी असल्याने दुरुस्त करून ६ जून २०१७ ला पून्हा पाठविली आहे . मंजूरी मिळाल्यावर लगेच कामाला सुरूवात केली जाईल.

उप अभियंता ( प्रभारी) कांबळे
फोटो : संग्रहीत

Post a Comment

Previous Post Next Post

नक्की वाचा