म्हसळा तालुक्यात योग दिवस उत्साहात साजरा...

म्हसळा तालुक्यात योग दिवस उत्साहात साजरा

म्हसळा तालुक्यात योग दिवस उत्साहात साजरा करण्यात आला असून विद्यार्थी,शिक्षक व नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी घेतला.प पू संगमदेव स्वामीजी यांच्या प्रेरणेने आणि प पू अदृश्य काडसिद्धेश्वर स्वामीजी यांच्या मार्गदर्शनाखाली गुरुकुल आरोग्य योगपीठ खरसई व रायगड जिल्हा योगा संघटनेच्या वतीने म्हसळा तालुक्यातील खरसई मराठी शाळा,न्यू इंग्लिश स्कूल खरसई, जिजामाता हायस्कुल अगरवाडा, ज्युनिअर कॉलेज मेंदडी,बनोटी,कापोली,बोर्ली,वसंतराव नाईक महाविद्यालय, स्वदेश आय एल एफ एस,पाभरे हायस्कुल इत्यादी ठिकाणी प्रशिक्षण देण्यात आले. या योग प्रशिक्षण वर्गात 1040 विद्यार्थ्यांनी लाभ घेतला.यावेळी प्रार्थना आसन प्राणायाम इत्यादी क्रिया विद्यार्थी व शिक्षकांना प्रात्यक्षिकासह करून घेण्यात आल्या.यावेळी उत्तम शारीरिक आरोग्य देण्यात योग साधनेची भूमिका कशी महत्वाची आहे? या बाबत सविस्तर मार्गदर्शन केले. तसेच नियमितपणे योग केल्याने दररोजच्या कामामुळे शरीर आणि मनावरील ताण कमी करण्यास मदत होते. त्यामुळे प्रत्त्येक व्यक्ती आनंदी आणि सुखी होणे सहज शक्य असल्याचे योग शिक्षक किशोर शिताळे यांनी  सांगितले. यौोगा केल्याने होणारे फायदे लक्षात घेता सर्वांनी पुढील काळात नियमितपणे योग साधना करण्याचा मानस केला.

Post a Comment

Previous Post Next Post

नक्की वाचा