“ विवेकानंद शिक्षण संस्थेचे संस्कारक्षम पिढी घडविण्यात योगदान” : मा. डॉ. यशवंत थोरात, माजी चेअरमन नाबार्ड

 


“ विवेकानंद शिक्षण संस्थेचे संस्कारक्षम पिढी घडविण्यात योगदान” : मा. डॉ. यशवंत थोरात, माजी चेअरमन नाबार्ड

म्हसळा : सुशील यादव

सरकार अनेक सामाजिक योजना राबवीत असते त्यात शिक्षण व्यवस्था असते. समस्येचे अनेक पूल पार करत शिक्षण व्यवस्था पुढे जात असते. समाजात काही बदल घडविण्याचे काम हि शिक्षण व्यवस्था करते. श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेने ज्ञान , विज्ञान आणि सुसंस्कार यासाठी शिक्षण प्रसार या शैक्षणिक धोरणातून समाजात जीवन्मुली रुजविण्याचे कार्य केलेले आहे. असे विचार डॉ. यशवंत थोरात यांनी शिक्षणमहर्षी डॉ. बापुजी साळुंखे यांच्या ९९ व्या जयंती समारंभांनिमित्त प्रमुख पाहुणे म्हणून बोलताना व्यक्त केले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कोल्हापुरचे जिल्हाधिकारी  अविनाश सुभेधार होते.

      डॉ. यशवंत थोरात यांनी ‘भारतीय शिक्षण काही विचार’ या विषयावर बोलताना या देशातील समाज व्यवस्था आणि शिक्षण व्यवस्था यावर आपले मुलभूत विचार व्यक्त केले. स्वातंत्र्योत्तर काळामध्ये या लोकशाही देशामध्ये दर पाच वर्षांनी सरकार बदलते परंतु शिक्षण व्यवस्था हि अखंड चालणारी ज्ञान व्यवस्था असते. जागतिकीकरणाच्या आजच्या युगात शिक्षणासमोर अनेक समस्या आहेत.हि शिक्षण व्यवस्था प्रगतीकडे नेते असताना विद्यार्थ्याला स्वावलंबी व संस्कारशील बनविणारी हवी तरच देश विकासाच्या महासत्तेकडे वाटचाल करेल असा आशावाद त्यांनी व्यक्त केला.

      आपल्या अध्यक्षीय भाषणात कोल्हापूरचे जिल्हाधिकारी डॉ. अविनाश सुभेदार यांनीही आजच्या शिक्षण व्यवस्थेबद्दल मौलिक विचार मांडले. पूर्वी अत्यंत कठीण परिस्थितीत खेड्यापाड्यातील मुले कोणत्याही सुखसोई नसताना शिक्षण घेत होती. त्यांच्यामध्ये शिकण्याची खूप जिद्द, चिकाटी होती. डॉ. बापुजी साळुंखे यांनी खेड्यापाड्यातील दुर्गम भागात शाळा कॉलेजेस उभी केल्याने या मुलांना शिक्षण मिळाले. परंतु आजही ८०%मुलांची १२ वी पर्यंत शिक्षणामध्ये गळती दिसत आहे. या मुलांसमोर नोकरी ,व्यवसायाची कोणतीही संधी दिसत नाही. त्यामुळे या मुलांना शिक्षणाच्या प्रवाहात पुन्हा आणणे हि समाजासामोराची मोठी जबाबदारी आहे. तसेच सुशिक्षित तरुण वर्गालाही नोकरी व्यवसायात पुरेशा संधी उपलब्ध होत नाहीत. यासाठीही प्रयत्न करणे गरजेचे आहे. असे ते म्हणाले. यावेले डॉ. उषाताई थोरात यांनीही आपले विचार व्यक्त केले.

      शिक्षणमहर्षी डॉ. बापुजी साळुंखे यांच्या जयंतीनिमित्त सुरुवातीला प्रमुख पाहुण्यांनी व संस्था पदाधिकार्यांनी डॉ. बापुजी साळुंखे व संस्थामाता श्रीमती सुशीलादेवी साळुंखे यांच्या समाधीचे दर्शन घेऊन पुष्पचक्र अर्पण केले. कार्यक्रमाची सुरुवात प्रतिमापूजन व संस्थेच्या प्रार्थनागीताने करण्यात आली. महेश हिरेमठ व त्यांच्या साथीदारांनी संस्थेची प्रार्थना व भक्तिगीते सादर करून सर्वांना मंत्रमुग्ध केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक संस्थेचे कार्याद्याक्ष प्राचार्य अभयकुमार साळुंखे यांनी केले. पाहुण्यांचा परीचय संस्थेचे सहसचिव प्राचार्य डॉ. अशोक करांडे यांनी करून दिला. यावेळी पाहुण्याच्या हस्ते कृष्णा बंडू कांबळे यांच्या ज्ञानदीप डॉ. बापुजी साळुंखे या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले. तसेच विवेकानंद कॉलेज माजी विद्यार्थी व सध्याचे पुणे येथील वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजयासिंग रामकृष्ण गायकवाड याना राष्ट्रपती पदक प्राप्त झाल्याबद्दल त्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी १२ वी बोर्ड परीक्षा व सीईटी परीक्षेतील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला.

      कार्यक्रमाचे आभार संस्थेच्या सचिव प्राचार्या शुभांगी गावडे यांनी मानले. सूत्रसंचालन डॉ. डी . ए. देसाई यांनी केले. कार्यक्रमाचे संयोजन संस्थेच्या वतीने विवेकानंद कॉलेज्चे प्राचार्य डॉ. एस. वाय. होनगेकर व सहकार्यांनी केले. या प्रसंगी प्राचार्य पी.एस.चव्हाण, डॉ. शरदचंद्र साळुंखे , प्रा. जे.एफ. पाटील, शाहीर कुन्तिनाथ करके, यशवंत भालकर तसेच संस्थेचे आजी माजी पदाधिकारी, विविध शाखांचे प्राचार्य, मुख्याद्यापक, गुरुदेव कार्यकर्ते व विद्यार्थी विद्यार्थिनी बहुसंख्येने उपस्थित होते.  

Post a Comment

Previous Post Next Post

नक्की वाचा