बँकिंग सेवेतील त्रुटींबाबत ग्राहकांनी सतर्क राहणे गरजेचे : एस.एन. जगताप




बँकिंग सेवेतील त्रुटींबाबत ग्राहकांनी सतर्क राहणे गरजेचे : एस.एन. जगताप

म्हसळा : सुशील यादव

रोजच्या दैनंदिन जीवनात आता बँकिंग सेवाही महत्वाची होत चालली आहे.मात्र काही तांत्रिक कारणांमुळे बँकिंग सेवेबाबत ग्राहकांना समस्या उद्भवू लागल्या आहेत. अशा समस्यांना न घाबरता ग्राहकांनी थेट बँकेशी संपर्क साधल्यास त्याचे तात्काळ निवारण करणेत येऊन उत्तम सेवा देता येईल. मात्र यासाठी ग्राहकांनी सतर्क राहणे आवश्यक असल्याचे मत दि रायगड जिल्हा मध्यवर्ती सह. बँक लि. शाखा म्हसळाचे  व्यवस्थापक एस.एन.जगताप यांनी देवघर कोंड , म्हसळा येथे ‘आर्थिक साक्षरता सप्ताह’ निमित्त आयोजित ग्रामस्थांच्या मेळाव्यात केले. ते पुढे म्हणाले आता सर्वच बँका इंटरनेट चा वापर करून ग्राहकाना सेवा देत आहेत. यामध्ये ए.टी.एम., इंटरनेट बँकिंग या सेवांचा समावेश आहे. ए.टी.एम. मधून पैसे वेळीच न निघणे , पूर्वसूचना न देता सेवांवर शुल्क आकारणे, क्रेडीट कार्ड बाबतीतल्या समस्या अशा अनेक प्रकारच्या समस्या ग्राहकांना दैनंदिन कामकाजात येत असतात. अशावेळी आपण न घाबरता तात्काळ आमच्याशी म्हणजेच बँकेशी संपर्क साधावा अथवा ऑनलाइन तक्रार दाखल करावी. तुमच्या तक्रारीची आम्ही जरूर दखल घेऊ व आलेल्या समस्येचे निवारण करू. यामुळे बँक व ग्राहक हे नाते अधिक घनिष्ठ होऊन बँकेच्या विविध योजनांचा लाभ घेणे सोयीचे होईल. यावेळी सदर मेळाव्याला शाखा निरीक्षक एस.जी.शिर्के , लेखापाल यु.आर. खेडेकर, व्ही.बी.पयेर, ग्रामस्थ मंडळाचे अध्यक्ष सुभाष कदम, सचिव जितेंद्र गिजे, सल्लागार गोविंद बोर्ले, गणपत मुंडे यांच्यासहित देवघर कोंड येथील ग्रामस्थ व महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते.  

Post a Comment

Previous Post Next Post

नक्की वाचा