गावाच्या एकीने गावात आले पाणी उद्घाटन मुंबई मंडळाचे अध्यक्ष राजुजी जाधव साहेब यांच्या हस्ते
म्हसळा - (प्रतिनिधी जयसिंग बेटकर)
म्हसळा तालुक्याच्या दुर्गम भागात वसलेले न्यु.अंनतवाडी (ठाकरोळी) गावात लोकांची पाण्यासाठी वणवण भटकंती होती अनेक वर्षांपासून हि तहान अखेर ग्रामस्थ व महिला मंडळ यांच्या सहकार्याने पुर्ण झाली
दिनांक १८ जून २०१७ वार रविवार रोजी ठिक सकाळी ९.३० वाजता स्वतंत्र नळपाणी योजनेचे उद्घाटन न्यु.अंनतवाडी चे मुंबई मंडळाचे अध्यक्ष सन्मानिय श्री राजुजी जाधव साहेब यांच्या शुभहस्ते करण्यात आले. या पाण्याचा अंदाजीत खर्च १२ लाख करण्यात आले गावात एकूण ४५ कुटुंब आहेत या प्रत्येक कुटुंबाने खारीचा वाटा उचलुन आपले आर्थिक भार उचलला शिव शक्ती महिला मंडळ न्यु.अंनतवाडी, क्रिकेट संघ मंडळ, मुंबई व ग्रामीण ग्रामस्थ मंडळ यांनी सिंहाचा वाटा उचलला आणि पाण्याचा प्रश्न गंभीर असणाऱ्या विषयावर गावाच्या एकजुटीने स्वप्न पुर्ण झाले. सामाजिक एकता ठेवून गावचे कार्य भविष्यात असेच करून गाव प्रगती पथावर आणण्याचे काम सर्वांच्या सहकार्याने करत राहु असे अध्यक्ष जाधव साहेब यांनी प्रास्ताविक मध्ये सांगितले
या उद्घाटनप्रसंगी या पाण्याचे बांधकाम करणारे, कारागिर श्री. महादेव जी. शिंदे साहेब उपस्थित होते. या कार्यक्रमासाठी उपस्थित मुंबई मंडळाचे कार्याध्यक्ष श्री लक्ष्मण खेरटकर, अध्यक्ष राजु जाधव, सचिव किशोर जाधव, ग्रामीण अध्यक्ष भिवा खोपरे, सचिव परशुराम डांगे, शिवशक्ती महिला मंडळ अध्यक्षा सरस्वती कापडी, उपाध्यक्षा अल्पा डांगे. ग्रामस्थ व महिला मंडळ उपस्थित होते.
Post a Comment