गुन्हे रोखण्यासाठी म्हसळा पोलीसांनी बसवीले शहरात सीसीटीव्ही कॅमेरे...

गुन्हे रोखण्यासाठी  म्हसळा पोलीसांनी बसवीले शहरात सीसीटीव्ही कॅमेरे
    
    स्थानिक व्यापारी व लोकवर्गणीतुन 12  सीसीटीव्ही कॅमेरे

म्हसळा( सुशील यादव)
            म्हसळा शहरातील व्यापाऱ्यांच्या दुकानांमध्ये होणाऱ्या लहान  मोठ्या  चोऱ्या रोखण्यासाठी,शहरातील रस्त्यांवर होणारी छेड़छाड़, मारामारी तसेच अन्य  बाबींवर बारकाईने लक्ष  ठेवुन कित्येक दिवस धुमाकुळ घालणाऱ्या चोरट्यांच्या मुसक्या आवळण्यासाठी म्हसळ्यातील व्यापारी संघटना व पोलिस प्रशासनाने संयुक्तरित्या लोकवर्गणी जमा करून शहरात विविध ठिकाणी तब्बल 12 सीसीटीव्ही कॅमेरे बसवले आहेत. 
        म्हसळा शहराचा झपाट्याने विकास होत असताना त्याची सुरक्षितताही महत्वाची आहे. म्हसळा शहर ही एकमेव बाजारपेठ तालुक्यातील आजुबाजुच्या जवळपास 84 गावांना असल्याने या गावातील नागरिक घाऊक  व किरकोळ खरेदी करीता शहरात येतात. 
शहरात खरेदीसाठी आलेल्या या नागरीकांचे मोबाइल फोन चोरी करणे, गाडी पार्कींगला लावताना वाद निर्माण करणे, टुरीस्ट जवळ वाद घालणे, बेजबाबदारपणे वाहन चालवणे, व्यापाऱ्यांच्या दुकानात चाेरी होणे अशा अनेक घटनांचे प्रमाण वाढल्याने  या बाबींकडे शहरातील अपुरी पोलिस यंत्रणा कायमस्वरुपी लक्ष देवु शकत नसल्याने म्हसळा पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सुदर्शन गायकवाड़ यांनी पुढाकार घेवुन शहरात मुख्यतः बाजारपेठ, दिघी नाका, बस स्थानक, पाभरा फाटा, पोलिस ठाणे परिसर या सर्व ठिकाणी तब्बल 12 सीसीटीव्ही कॅमेरे बसवीले आहेत. याच्या मदतीने चोरांचा शोध घेणे त्याचप्रमाणे वाढत्या गुन्हेगारिवर नियंत्रण मिळविण्यास पोलीसांना नक्कीच मदत होईल. हे कॅमेरे बसविल्यामुळे विशेषतः व्यापारीवर्गाकडुन म्हसळा पोलिस प्रशासनाचे कौतुक होत  आहे.


"म्हसळ्याचे झपाट्याने शहरीकरण होत आहे त्यामुळे सुरक्षिततेच्या दृष्टीने सिसिटीव्ही बसविणे गरजेचे आहे. वाढती गुन्हेगारी रोखण्यासाठी पोलीसांना नक्कीच  याचा फायदा होईल. तिसरा डोळा कार्यरत असल्याने हावभावावर सुद्धा वचक  राहील.
योगेश करडे , व्यापारी , म्हसळा

Post a Comment

Previous Post Next Post

नक्की वाचा