तालुक्यातील खरसई ग्रामपंचायतीत सातबारामध्ये अचूक संगणकीकृत अधिकार अभिलेखांसाठी तलाठी, मंडळ अधिकारी व महसूल अधिकाऱ्यांकडून चावडी वाचन मोहिमे अंतर्गत चावडी वाचन उत्साहात संपन्न झाले. याप्रसंगी ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. या मोहिमेत ई-प्रणाली व ई-चावडी प्रणालीची कार्यवाही यशस्वी करण्यासाठी चावडी वाचनाचा उपक्रम राबविला जात आहे.खरसईतील या विशेष मोहिमेत हरिष हाके , तलाठी पांडुरंग पागिरे ,खरसई सरपंच निलेश मांदाडकर या प्रमुखांच्या हस्ते शेतक-यांना संगणकीकृत सातबाराचे वितरण करण्यात आले. या सातबारा वितरण मोहिमेस ग्रामस्थांनी मोठा प्रतिसाद दिला. यावेळी उपस्थितांना सातबाराचे वाटप करण्यात आले. या प्रसंगी रामदास कांबळे ,परशुराम मांदाडकर,भाऊ पयेर, जनार्दन पयेर, पुष्पा मेंदडकर, चंद्रकांत खोत,भालचंद्र म्हसकर आदी उपस्थित होते.

Post a Comment