लोकनेते दिबांना मरणोत्तर महाराष्ट्र भूषण पुरस्कार’
पाठ्यपुस्तकात लेख, महापालिकांनी शिष्यवृत्ती आणि त्यांच्या नावाने पुरस्कार सुरू करावेतः पनवेल संघर्ष समितीची मागणी
पनवेलः
शेतकर्यांचे आराध्य दैवत ठरलेल्या दिवंगत लोकनेते दि. बा. पाटील यांना राज्य शासनाने यंदाचा ‘मरणोत्तर महाराष्ट्र भूषण पुरस्कार’ घोषित करावा, त्यांनी शेतकर्यांसाठी १९८४ साली शेतकर्यांच्या न्याय हक्कासाठी दिलेल्या स्फूर्तीदायक लढ्यावरील विस्तृत लेखाचा महाराष्ट्र शासनाने पाठ्यपुस्तकात समावेश करावा, अशी मागणी पनवेल संघर्ष समितीने राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि सांस्कृतिक मंत्री विनोद तावडे यांच्याकडे निवेदनातून केली आहे. यासंदर्भात त्यांची प्रत्यक्ष भेट घेण्यात येईल तसेच राज्यातील विविध पक्षांचे अध्यक्ष, आमदार, खासदारांना शिफारस करण्याची विनंतीही करण्यात आलेली आहे, अशी माहिती संघर्षचे अध्यक्ष कांतीलाल कडू यांनी दिली.
याशिवाय नवी मुंबईचे महापौर सुधाकर सोनावणे व पनवेल महापालिकेचे आयुक्त डॉ. सुधाकर शिंदे यांना आज, प्रत्यक्ष भेटून दिलेल्या निवेदनातून लोकनेते दिवंगत दि. बा. पाटील यांच्या कर्तृत्वाची दखल घेवून त्यांच्या नावे ‘समाजभूषण पुरस्कार’ सुरू करण्यासोबत विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती सुरू करण्याची महत्वपूर्ण मागणी केली आहे. तसेच दोन्ही महापालिकांनी त्यांच्या परिक्षेत्रात दिबांचा पुतळा उभारावा, असेही सुचविण्यात आले आहे.
पनवेल नगरीचे थेट निवडणूकीतून नगराध्यक्ष ते पाच वेळा विधानसभा, दोन वेळा खासदार, राज्याच्या विधानसभेचे विरोधी पक्ष नेते अशी उर्त्तंुग राजकीय कारर्कीद घडविताना, शेतकर्यांच्या न्याय हक्कासाठी दिलेला १९८४ चा ऐतिहासिक लढा देशात शेतकरी क्रांती घडविण्यास कारणीभूत ठरला आहे. नवी मुंबईच्या विकासाचे पायाभूत धोरण दि. बा. पाटील यांच्या संकल्पनेतून निर्माण झाले आहे. बोफोर्सप्रकरणी राजीनामा देणारे पहिले खासदार आणि आणीबाणीच्यावेळी स्थानबद्ध झालेले पहिले नेते, असा इतिहास ज्यांच्या नावाने महाराष्ट्रात निर्माण झाला आहे. त्या लोकनेत्याला शासन आणि नवी मुंबई, पनवेल महापालिकेने मानाचा मुजरा करताना त्यांच्या नावाने पुरस्कार, शिष्यवृत्ती द्यावी, अशी विनंती केली आहे.
महापौर सोनावणे आणि आयुक्त डॉ. शिंदे यांनी संघर्षच्या शिष्टमंडळाशी याबाबत सविस्तर चर्चा करून सकारात्मकतेने निर्णय घेणार असल्याचे सुतोवाच दिले. संघर्षचे अध्यक्ष कांतालील कडू यांनी याच निवेदनाच्या प्रति लवकरच रायगड जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष आदिती तटकरे आणि सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक भूषण गगरानी यांची भेट घेवून देणार असल्याचे सांगितले. जिल्हा परिषद आणि सिडकोनेसुद्धा दिबांच्या ‘समाजभूषण भूषण’ आणि विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती सुरू करावी, अशी त्यांच्याकडेही मागणी करणार आहेत.
शिष्टमंडळात अध्यक्ष कांतीलाल कडू, उपाध्यक्ष विजय काळे, ज्येष्ठ सदस्या माधुरी गोसावी, पराग बालड, ऍड. संतोष सरगर, मच्छिंद्र नाईक, मंगल भारवड, कुंदा गोळे, भारती जळगावकर, रूपाली शिवथरे, वैशाली सुर्वे आदींचा समावेश होता.
दिबांच्या नावाशिवाय नवी मुंबईचा इतिहास पूर्ण होऊ शकत नाहीः सोनावणे
लोकनेते दिबांच्या त्यागामुळे नवी मुंबई निर्माण झाली आहे. त्यांच्याशिवाय नवी मुंबईचा इतिहास लिहून पूर्ण होणार नाही. त्यांचे स्मारक नवी मुंबईत व्हावे, असा आमचाही विचार सुरू आहे. नव्या पिढीला त्यांच्या कर्तृत्वाची ओळख झाली पाहिजे. दिबांनी निर्माण केलेला इतिहास महाराष्ट्राला दिशा दाखवत आहे. नवी मुंबईत शिवस्मारक झाले अन्य समाजसुधारकाची स्मारके उभारली आहेत. ज्या दिबांनी नवी मुंबई वसवली त्यांच्या नावाने शिष्यवृत्ती सुरू करणे, स्मारक उभारणे आणि पुरस्कार देणे याबाबतीत हा प्रस्ताव तयार करून सभागृहासमोर ठेवला जाईल आणि त्याची अंमलबजावणी होईल.
- सुधाकर सोनावणे (महापौर, नवी मुंबई)
सभागृहात कुणी विरोध करेल असे वाटत नाहीः डॉ. शिंदे
लोकनेते दि. बा. पाटील यांचा गौरवशाली इतिहास आहे. त्यांच्याबाबतीतील संघर्षने दिलेल्या निवेदनाचा प्रस्ताव तयार करून लवकरच सभागृहात ठेवण्यात येईल. सकारत्मतेने याबाबतीत विचार केला जाईल. नव्या सभागृहातील सदस्यांपैंकी कुणी या प्रस्तावाला विरोध करेल असे वाटत नाही. संघर्षने चांगला मुद्दा हाती घेतला आहे. दिबांचा त्याग नव्या पिढीला प्रेरणादायी ठरणार आहे. त्यांच्या नावाने शिष्यवृत्ती अथवा पुरस्कार घोषित करण्याचा महापालिकेला घटनात्मक निर्णय आहे, असे वाटत नाही. परंतू सभागृहाने निर्णय घेतल्यास ते उचित ठरणार असून त्याची अंमलबजावणी होऊ शकते.
- डॉ. सुधाकर शिंदे (आयुक्त, पनवेल महापालिका)
दि. बा. पाटील नसते तर...!
समाजात नांदणारी विद्वत्ता, संपन्नता आणि संघर्षाचे जनक दिवंगत लोकनेते दि. बा. पाटील आहेत. 1984 साली राज्य सरकारविरोधी रणशिंग फुंकले नसते तर आज कदाचित समाज नको, त्या आगीत होरपळत राहिला असता. ते शेतकरी, कष्टकरी, श्रमजीवी समाजाचे दैवत आहेत. राज्य शासनाने त्यांच्या कार्याची दखल घेवून मरणोत्तर महाराष्ट्र भूषण पुरस्कार’ दिल्यास दिबांच्या सोनेरी इतिहासाला उजाळा मिळेल. दिबा झालेच नसते तर आपण समाजाच्या उन्नतीची कल्पनाच करू शकलो नसतो.
-कांतीलाल कडू
(अध्यक्ष, संघर्ष समिती)
आगरी-कोळ्यांची अस्मिता
लोकनेते दि. बा. पाटील यांना आम्ही जवळून अनुभवले आहे. त्यांचा लढवय्या स्वभाव, करारी बाणा, अभ्यासूपणा आणि शिस्त यातून अनेक कार्यकर्ते, नेते घडले आहेत. त्यांनी अतिशय पोटतिडकीने पनवेल, उरण आणि नवी मुंबईच्या प्रकल्पग्रस्त, शेतकर्यांना राज्य शासनाच्याविरोधात झगडून, लढे देवून न्याय दिलेला आहे. दि. बा. पाटील समाजाची अस्मिता आहे. संघर्षने केलेल्या मागणीचा विचार झाल्यास नवा इतिहास प्रस्थापित होईल. राज्य शासनाने संघर्षच्या मागणीची गार्ंभीयाने विचार करावा.
-माधुरी गोसावी
(ज्येष्ठ सदस्या, संघर्ष समिती)

Post a Comment