गटशिक्षणाधिकारी मा श्री गजानन साळुंखे सरांची गटशिक्षणाधिकारी म्हणून वर्षपूर्ती...



( फोटो :- संग्रहित )

आपल्या म्हसळा गटाचे गटशिक्षणाधिकारी मा श्री गजानन साळुंखे सर हे कर्जत वरून केंद्रप्रमुख या पदावर आमशेत येथे हजर झाले त्यांचे कामातील कार्यतत्परता पाहून तत्काळीन गशिअ मा टाळकुटे मॅडम यांनी विस्तार अधिकारी पदाची धुरा दिली नंतर शापोआ अधिक्षक, गटसमन्वयक पदभारही साळुंखे सरांकडे आला.   आपल्या सर्वाच्या सहकार्याने दि-23/6/16 रोजी गटशिक्षणाधिकारी  पदभार स्विकारला. मिञहो शिक्षकांमधून केंद्रप्रमुख म्हणून कार्यरत असल्याने शिक्षकांच्या व्यथा माहीत असल्याने सर्वांना विश्वासात घेवून अधिकारी व पदाधिकारी यांचेशी सलोखा राखून आपल्या शिक्षण विभागाचे कार्य उत्तमरित्या सांभाळले. आज या पदावर हजर होवून 1 वर्षे पूर्ण होत आहे या काळात त्यांनी आपल्या सहकार्याने म्हसळा तालुका 100% प्रगत घोषित केला. तसेच शिक्षकांचे कोणतेही काम असले तरी सहीसाठी अडवणूक न करता भेटेल तेथे सही तसेच BRC सुशोभिकरण अशी अनेक उल्लेखनिय कामे केली हा 1 वर्षाचा काळावधी निर्विघ्न  व यशस्वी पार पाडल्याबद्दल त्यांचे अभिनंदन तसेच पुढील वाटचालीस शुभेच्छा.

Post a Comment

Previous Post Next Post

नक्की वाचा