केंद्रीय मंत्री अनंत गीते
यांचा रायगड जिल्हा दौरा कार्यक्रम
अलिबाग,दि.19(जिमाका)-केंद्रीय अवजड उद्योग व सार्वजनिक उपक्रम मंत्री अनंत गीते हे दिनांक 20 जून 2017 रोजी रायगड जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत असून त्यांचा सविस्तर दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे.
मंगळवार दि.20 रोजी दुपारी 3.00 वाजता मुंबई येथून अलिबाग जि.रायगडकडे प्रयाण. सायंकाळी 7.00 वाजता हॉटेल रॅडिसन अलिबाग जि.रायगड येथे आगमन व मुक्काम.
बुधवार दि.21 जून 2017 रोजी सकाळी 7.45 वाजता हॉटेल रॅडिसन येथून अलिबागकडे प्रयाण. सकाळी 8.00 वाजता चिंतामणराव केळकर विद्यालय,अलिबाग रेवदंडा बायपास रोड येथे आंतरराष्ट्रीय योग दिन कार्यक्रमास उपस्थिती.सकाळी 9.15 वाजता हॉटेल रॅडिसनकडे प्रयाण. 10.00 वाजता हॉटेल रॅडीसन येथे आगमन. दुपारी 1.00 वाजता हॉटेल रॅडिसन येथून मुंबईकडे प्रयाण.
Post a Comment