उत्तर प्रदेशातील लखमीपूर येईल घटनेच्या निषेधार्थ तळा बाजारपेठ बंद ठेवून व्यक्त केला निषेध.

उत्तर प्रदेशातील लखमीपूर येईल घटनेच्या निषेधार्थ तळा बाजारपेठ बंद ठेवून व्यक्त केला निषेध.


 तळा-किशोर पितळे
उत्तर प्रदेशातील घटनेचा निषेध म्हणून तळा बाजारपेठेतील व्यापाऱ्यांनी दुपारी  एक वाजेपर्यंत आपली दुकाने बंद ठेऊन निषेध नोंदवला. उत्तर प्रदेशातील लंखिमपूर येथे निष्पाप शेतकऱ्यांना चिरडणाऱ्या भाजपच्या केंद्रीय गृहमंत्र्याच्या पुत्रावर कडक कारवाई करून निष्पाप शेतकऱ्यांना न्याय देण्याच्या मागणी करिता महायुतीने पुकारलेल्या बंदमध्ये तळा शहरातील व्यापाऱ्यांनी सहभाग घेतला. सोमवारी संपूर्ण दिवस बाजारपेठ बंद करण्यासंदर्भात शिवसेनेकडून व्यापाऱ्यांना पत्र देण्यात आले होते. त्यावर निर्णय घेण्यासाठी शहरातील स्टेट बँकेच्या वर असलेल्या मंगल कार्यालयात बाजारपेठेतील सर्व व्यापाऱ्यांची बैठक पार पडली या बैठकीमध्ये उत्तर प्रदेशातील घटनेचा निषेध व्यक्त करण्यात आला.परंतु लॉकडाऊन काळापासून व्यापाऱ्यांना वारंवार आपली दुकाने बंद ठेवावी लागली असून अनेक कारणांमुळे आर्थिक अडचणींना सामोरे जावे लागले आहे.त्यातच सध्या नवरात्रोत्सव सुरू असल्याने ग्राहकांची गैर सोय व्हायला नको यासाठी पूर्णवेळ बाजारपेठ बंद न ठेवता एक वाजेपर्यंत अर्धा दिवस बाजारपेठ बंद ठेवण्याचा निर्णय सर्वानुमते घेण्यात आला. त्यानुसार सोमवारी मेडिकल,दूध हे अत्यावश्यक सेवेतील दुकाने वगळता ईतर सर्व व्यवसाय दुपारी एक वाजेपर्यंत पुर्णतः बंद ठेवण्यात आले होते.

1 Comments

  1. Best casinos in the world to play blackjack, slots and video
    hari-hari-hari-hotel-casino-online-casinos-in-us · blackjack nba매니아 (blackjack) · roulette (no 사설 토토 사이트 Blackjack Video Poker 출장안마 · Video Poker · Video Poker · 바카라 Video poker

    ReplyDelete

Post a Comment

Previous Post Next Post

नक्की वाचा