लखीमपुर खिरी घटनेच्या निषेधार्थ म्हसळा बंदला उस्फुर्त प्रतिसाद.

फोटो : शिवसेना तालुका प्रमुख महादेव पाटील, काँग्रेस आयचे अध्यक्ष मुविज शेख,शेकाप तालुका चिटणीस संतोष पाटील केंद्र सरकारचे निषेधपत्र तहसीलदारना देताना


तालुक्यातील महाविकास आघाडीत मात्र मतभेद  
राष्ट्रवादी काँग्रेस आणि सेना,शेकाप,काँग्रेस (आय) वेगवेगळे मोर्चे.

संजय खांबेटे : म्हसळा 
उत्तर प्रदेशातील लखीमपुर खिरी येथे अन्नदाता शेतकरीराजा न्याय हक्कासाठी केंद्र सरकारच्या दारी शांततेत व अहिंसा मार्गाने आंदोलन करीत असताना शेतकऱ्यांचे आंदोलन चिरडून टाकण्या साठी केंद्रसरकार मधील काही घटकानी हिंसेचा मार्ग अवलंबून शेतकऱ्यांची हत्या करण्याचा प्रकार घडला.सदर घटनेचा निषेध करण्यासाठी महाराष्ट्र राज्य सरकार मधील महाविकास आघाडीतील पक्षांनी आज महाराष्ट्र बंदचे आवाहन केले. म्हसळयामध्ये मध्ये मात्र आघाडीतील राष्ट्रवादी काँग्रेसने आणि सेना,शेकाप, काँग्रेस (आय) या पक्षानी जनतेला आवाहन स्वंतत्रपणे केले.केंद्रसरकारचा निषेध वेगवेगळे मोर्चे काढून नोंदविल्याची घटना घडली.म्हसळा तालुक्यातील नागरिकांनी व व्यापारी वर्गाने शासनाचे बंदला जाहीर पाठींबा देवुन बंद मध्ये सहभाग नोंदवला. यावेळी आघाडीत शिवसेना,शेकाप, काँग्रेस (आय) या तीन पक्षांचे माध्यमातून  शिवसेना तालुका प्रमुख महादेव पाटील,काँग्रेस अध्यक्ष मुविज शेख,शेकाप तालुका चिटणीस संतोष पाटील यांनी आणि राष्ट्रवादी  काँग्रेसचे तालुका अध्यक्ष समीर बनकर यांच्या अध्यक्षतेखालील मोर्चेकरानी स्वतंत्रपणे तहसीलदार तथा कार्यकारी दंडाधिकारी समीर घारे यांचे जवळ केंद्र सरकारचे निषेध पत्र दिले.


फोटो : राष्ट्रवादी  काँग्रेसचे तालुका अध्यक्ष समीर बनकर, महिला अध्यक्ष रेश्मा कानसे,जि.प. सभापती बबन मनवे आणि कार्यकर्ते  केंद्र सरकारचे निषेधपत्र तहसीलदारना देताना

Post a Comment

Previous Post Next Post

नक्की वाचा