'दादां'च्या आठवणीने म्हसळा गहिवरला! अस्थी कलश दर्शनासाठी मोठी गर्दी



​म्हसळा : सुशील यादव 

महाराष्ट्र राज्याचे कणखर, अभ्यासू आणि कार्यक्षम लोकनेते, माजी उपमुख्यमंत्री स्व. अजितदादा पवार यांच्या अस्थी कलश दर्शनाचा कार्यक्रम आज (४ फेब्रु.)म्हसळा शहरात अत्यंत भावपूर्ण वातावरणात संपन्न झाला. आपल्या लाडक्या नेत्याचे अंत्यदर्शन घेण्यासाठी म्हसळा एसटी स्थानक परिसरात नागरिक आणि कार्यकर्त्यांनी प्रचंड गर्दी केली होती.
​यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे युवा नेते व माजी आमदार अनिकेत तटकरे यांच्या नेतृत्वाखाली पक्षाचे अनेक दिग्गज पदाधिकारी उपस्थित होते. यामध्ये प्रामुख्याने
​तालुकाध्यक्ष समीर बनकर
​माजी सभापती महादेव पाटील, नाझिम हसवारे
​नगराध्यक्ष अनिकेत पानसरे
​गटनेते संजय कर्णिक
​महिला आघाडी  मीना टिंगरे, सोनल घोले, रेश्मा कानसे, वनिता खोत व अन्य पदाधिकारी
​यासोबतच जिल्हा परिषद उमेदवार अनिल बसवत, अभिषेक विचारे, पंचायत समिती उमेदवार बबन मनवे, लहू म्हात्रे आणि नगरसेवक सुनील शेडगे, यांच्यासह असंख्य कार्यकर्त्यांनी उपस्थित राहून आपल्या जननेत्याला श्रद्धांजली वाहिली.
​महाराष्ट्राच्या राजकारणात 'विकासाचा महामेरू' म्हणून ओळखल्या जाणाऱ्या अजितदादांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करताना अनेकांचे कंठ दाटून आले होते. त्यांच्या कणखर निर्णयक्षमतेच्या आणि शिस्तप्रिय कार्यपद्धतीच्या आठवणींना उजाळा देताना उपस्थित जनसमुदायाच्या डोळ्यांत अश्रू तरळले.

​"दादा केवळ नेते नव्हते, तर महाराष्ट्राच्या विकासाचा कणा होते. त्यांच्या जाण्याने निर्माण झालेली पोकळी कधीही भरून न येणारी आहे," अशा भावना तालुका अध्यक्ष समीर बनकर यांनी व्यक्त केल्या.
         ​अतिशय शांततेत आणि शिस्तबद्ध पद्धतीने पार पडलेल्या या कार्यक्रमातून स्व. अजितदादा पवार यांच्याप्रती सर्वसामान्यांच्या मनात असलेले अपार प्रेम आणि आदर पुन्हा एकदा अधोरेखित झाला. संपूर्ण म्हसळा शहर आज आपल्या लाडक्या 'दादां'च्या स्मृतींनी भारावून गेले होते.

Post a Comment

Previous Post Next Post

नक्की वाचा