​MP Sunil Tatkare | खासदार सुनील तटकरे उद्या म्हसळा दौऱ्यावर; विकासकामांचा घेणार आढावा

​म्हसळा: सुशील यादव 
राष्ट्रवादी काँग्रेसचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष, माजी कॅबिनेट मंत्री आणि रायगडचे खासदार आदरणीय श्री. सुनीलजी तटकरे उद्या सोमवार, दिनांक २९ डिसेंबर २०२५ रोजी म्हसळा तालुक्याच्या दौऱ्यावर येत आहेत. या दौऱ्यात त्यांच्या अध्यक्षतेखाली तालुक्यातील विविध विकासकामांची महत्त्वपूर्ण आढावा बैठक आयोजित करण्यात आली आहे.
​ही बैठक दुपारी १:३० वाजता म्हसळा पंचायत समितीच्या सभागृहात पार पडणार आहे.
​बैठकीचे प्रमुख तपशील:
​प्रमुख उपस्थिती: ना. श्री. सुनीलजी तटकरे (खासदार व चेअरमन, केंद्रीय पेट्रोलियम व गॅस समिती)
​स्थळ: पंचायत समिती सभागृह, म्हसळा l.
​वेळ: दुपारी १:३० वाजता.
​विषय: तालुक्यातील प्रलंबित विकासकामे, नवीन योजनांची अंमलबजावणी आणि जनसामान्यांचे प्रश्न.
​कोकणचे 'भाग्यविधाते' म्हणून ओळखले जाणारे तटकरे या बैठकीत स्थानिक प्रशासकीय अधिकारी आणि पदाधिकारी यांच्याकडून विकासकामांचा सविस्तर आढावा घेणार आहेत. या बैठकीला तालुक्यातील लोकप्रतिनिधी, कार्यकर्ते आणि संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांनी वेळेवर उपस्थित राहावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

Post a Comment

Previous Post Next Post

नक्की वाचा