म्हसळा शहरातील ७ कोटींच्या विकासकामांचे भूमिपूजन, उद्घाटन

म्हसळा । म्हसळा तालुक्यात ग्रामीण भागातील जनतेच्या प्रश्नांची सोडवणूक होत असतानाच म्हसळा शहर विकासाला खा. सुनील तटकरे यांनी निधी उपलब्ध करुन प्राधान्य दिले आहे. २७ सप्टेंबर रोजी खासदार तटकरे यांनी म्हसळा नगरपंचायत हद्दीत एकाच वेळी ७ कोटी रुपये खर्चाच्या विकासकामांचे भर पावसात उद्घाटन व भूमिपूजन केले. तर नव्याने १ कोटी १० लाख रुपये खर्चाचे विकासकामांसाठी निधीची तरतूद केली आहे.

यामध्ये प्रामुख्याने म्हसळा एसटी बसस्थानक बांधकामासाठी ७० लाख रुपये, श्री कृष्ण मंदिर सभागृह बांधकामासाठी २५ लाख रुपये आणि शिंपी समाज सामाजिक सभागृह बांधकामासाठी १५ लाख रुपये निधीची मागणी केली असता खासदार तटकरे यांनी लागलीच उपलब्ध करुन दिले आहेत.
ठरल्याप्रमाणे भर पावसात खासदार तटकरे यांनी एकाच दिवशी, एकाच वेळी म्हसळा नगरपंचायत हद्दीतील ७ कोटी रुपये खर्चाच्या विविध लोकोपयोगी विकासकामांचे उद्घाटन व भूमिपूजन खा. तटकरे यांच्या हस्ते करण्यात आले. यामध्ये प्रामुख्याने तुरभाटली कब्रस्थान येथे संरक्षण भिंत बांधणे, बशीरखान ते रिझवान कुर्बानशहा यांच्या घरापर्यंत संरक्षण भिंत बांधणे, डॉ. सुभाष ओक घरासमोरील गटाराचे बांधकाम करणे, कन्याशाळा येथील उघड्या गटारावर ढापे टाकणे, नजीर हुर्जुक ते मुख्य रस्त्यापर्यंत काँक्रिटीकरण व नाल्याचे बांधकाम, बेलदार समाज सामाजिक सभागृह उद्घाटन या कामांचा समावेश आहे.
जनतेला भेडसावत असलेल्या हमरस्ता एसटी बसस्थानक ते नवानगर रस्ता काँक्रिटीकरण कामाचे भूमिपूजन खासदार सुनिल तटकरे यांच्या हस्ते करण्यात आले. विकासकामांच्या उद्घाटनप्रसंगी मुख्याधिकारी विठ्ठल राठोड, राष्ट्रवादीचे अध्यक्ष होते. समीर बनकर, जिल्हा चिटणीस महादेव सेलचे पाटील, अल्पसंख्यांक जिल्हाध्यक्ष नाझिम हसवारे, नगराध्यक्ष संजय कर्णिक, उपनगराध्यक्ष संजय दिवेकर, युवक अध्यक्ष फैसल गीते, शाहिद उकये, भाई बोरकर, हिरामण चव्हान, महिला अध्यक्षा मिना टिंगरे, माजी नगरध्यक्ष असहल कादरी, माजी सभापती बबन मनवे, छाया म्हात्रे, हिंदु समाज अध्यक्ष नंदकुमार गोविलकर, मुस्लीम समाज अध्यक्ष नाझिम चोगले, शहर अध्यक्ष रियाज घराडे, भाई दाफेदार, सुशिल यादव, सुनिल उमरोटकर, संदिप चाचले, माजी नगराध्यक्ष सुनिल शेडगे, नगरसेवक अनिकेत पानसरे, नासीर मिठागरे, नगरसेविका सुरेया आमदानी, नाना सावंत, अनिल बसवत महेश घोले आदी उपस्थित होते.

Post a Comment

Previous Post Next Post

नक्की वाचा