टीम म्हसळा लाईव्ह
गणेशोत्सव आता अवघ्या काही दिवसांवरच येऊ घातला आहे. या सणाच्या काळात चित्रपटसृष्टीही नवनवीन गणेशगीतांद्वारे प्रेक्षकांचं मनोरंजन करीत असते. यामुळेच गणेशोत्सवात यंदा कोणतं नवं चित्रपटगीत गजाननाचं स्वागत करणार याची उत्सुकता गणेशभक्तांनाही लागलेली असते. ‘महाडिक बंधू ’ प्रस्तुत गणपतीचं बालगीत प्रेक्षकांच्या भेटीला आलं आहे.
बाप्पा घेऊन या खूप सारी सुट्टी असे या गीताचे बोल आहेत. हे गीत गीतकार शंकर कृष्णा महाडिक यांनी लिहिले असून गायक, बालकलाकार कौस्तुभ सुतार यांनी गायल आहे.
शाहिर: दत्ता बुवा सुतार, कोसस: निष्ठा व श्रवण तर संगीत संयोजन कृपेश पाटील यांनी केलं आहे तर विडिओ एडिटिंग जिग्नेश तुपट यांनी केली आहे. सुभोध सुतार, आविष्कार सुतार, प्रशांत महाडिक ओमकार आगरकर यांच्या विशेष सहकार्याने हे गाणं युट्युब वर प्रदर्शित केलं आहे.
वर्ष भर देवा वाट मी पाहिली!
उंदीर मामाने वाट मला दावली !!
बाप्पा घेऊन खुप सारी सुट्टी!
नाहीतर घेईन मी तुमच्याशी कट्टी !!धु!!
कीती मोठे कान माझ्या बाप्पा चे !
इवले इवले डोळे माझ्या मोरया चे !!
बाप्पा... येताय ना... बाप्पा
आज शाळेला आमच्या शाळेला पडलीये सुट्टी !!
नाहीतर घेईन मी तुमच्याशी कट्टी
बाप्पा घेऊन या खूप सारी सुट्टी!
नाहीतर घेईन तुमच्याशी कट्टी !!१!!
नैवेद्य मिळेल तुला आवडीचे !!
दही भात गोड मोदकाचे !!
बाप्पा... येताय ना बाप्पा
आपली जमेल ना!! चांगलीच गट्टी!
नाहीतर घेईन मी तुमच्याशी कट्टी
बाप्पा घेऊन या खूप सारी सुट्टी
नाहीतर घेईन तुमच्याशी कट्टी !!२!!
आम्ही सारे फ्रेंड गुण गाऊ तुझे !
किती सुंदर रूप हे पाहू तुझे !!
बाप्पा.. येताय ना बाप्पा
मी आहे हो थोडासा हट्टी !!
नाहीतर घेईन मी तुमच्याशी कट्टी!
बाप्पा घेऊन या खूप सारी सुट्टी!!
नाहीतर घेईन मी तुमच्याशी कट्टी
🖋️गीतकार शंकर कृष्णा महाडिक
Post a Comment