म्हसळा | म्हसळा नगरपंचायत्तीमधील शिवसेना उबाठा च्या एकमेव सदस्या नगरसेविका सौ. राखी करंबे यांनी उबाठा पक्षाचा राजीनामा देऊन शिवसेना शिंदे गटात जाहीर प्रवेश केला. त्यांच्या सोबत त्यांचे पती अजय करंबे यांनीही शिवसेना उबाठा युवा सेनेच्या शहर अधिकारी पदाचा राजीनामा देऊन शिंदे गटात जाहीर प्रवेश केला.
आमदार भरत गोगावले आणि आम. थोरवे यांच्या प्रमुख उपस्थितीत पक्षप्रवेश करण्यात आला. यावेळी तालुका प्रमुख प्रसाद बोर्ले, युवासेना तालुका प्रमुख स्वप्नील चांदोरकर आणी शिवसैनिक मोठया संख्येने उपस्थित होते. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे स्थानिक.
पदाधिकारी कोणत्याही निर्णयात सामील करून घेत नसल्याने पक्ष सोडण्याचा निर्णय घेतला असल्याचे सौ. राखी करंबे यांनी सांगितले. शिवसेना नेते आमदार भरत गोगावले तसेच वरिष्ठ नेते जी जबाबदारी देतील ते योग्य प्रकारे पार पडणार असल्याचे राखी करंबे यांनी सांगितले. लोकसभा निवडणुकीत राखी करंबे आणी त्यांचे पती अजय करंबे यांनी अनंत गीते यांचा प्रचार जोमात केला होता. करंबे दांपत्य यांचा शिवसेना प्रवेशामुळे ठाकरे गटाला धक्का बसला आहे.
Post a Comment