म्हसळा प्रतिनिधी
महाराष्ट्र शासनामार्फत राबविलेला उपक्रम ‘मुख्यमंत्री माझी शाळा, सुंदर शाळा’ या स्पर्धेत म्हसळा तालुक्यातील न्यू इंग्लिश स्कूल व ज्युनिअर कॉलेज या शाळेने तालुकास्तरावर माध्यमिक शाळा गटात प्रथम क्रमांक प्राप्त केला आहे. यासाठी विद्यालयाचे प्राचार्य तथा रायगड विभाग प्रमुख प्रकाश हाके यांच्या मार्गदर्शनाखाली व सर्व शिक्षक, शिक्षिका, प्राध्यापक, शिक्षकेत्तर कर्मचारी व सर्व विद्यार्थी यांनी स्पर्धेसाठी विशेष परिश्रम घेतले.
या अंतर्गत विद्यालयात परसबाग, खतनिर्मिती, प्लास्टिक मुक्त शाळा, शालेय परिसर, आरोग्य, स्वच्छता असे अनेक उपक्रम राबवून त्यातून गुणांच्या आधारे तालुक्यात प्रथम क्रमांक पटकाविला आहे. तसेच जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी विद्यालय पात्र ठरले असून जिल्हास्तरीय कमिटी मार्फत मूल्यांकन करण्यात आले आहे. ही सर्व स्पर्धा यशस्वी करण्यासाठी विद्यालयाचे स्थानिक स्कूल कमिटी चेअरमन समीर बनकर व सदस्य यांचे मोलाचे सहकार्य लाभले. विद्यालयाने तालुकास्तरीय प्रथम क्रमांक प्राप्त केल्यामुळे रायगड जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षणाधिकारी पुनिता गुरव व गटशिक्षणाधिकारी संतोष दौंड यांनी अभिनंदन केले आहे. त्याचबरोबर पंचक्रोशीतील सर्व ग्रामस्थांकडून विद्यालयाचे अभिनंदन करण्यात येत आहे
Post a Comment