खरसई आदर्श शाळेचा आदर्श कारभार ; ठेकेदाराच्या बेजबाबदारपणाची विद्यार्थ्याला शिक्षा


प्रतिनिधी खरसई

एकीकडे बदलत्या जीवनशैलीमुळे पहाटे शाळा असेल तर लहान मुलांची झोप होत नाही. त्यामुळे त्यांच्या शाळांच्या वेळा बदलण्याचा विचार सरकारने करावा, असे राज्यपाल रमेश बैश (Ramesh Bais) यांनी काही दिवसांपूर्वी सुचविले होते. त्यानंतर येत्या शैक्षणिक वर्षापासून इयत्ता दुसरीपर्यंतच्या विद्यार्थ्यांची शाळा सकाळी ९ वाजल्यानंतरच सुरू करण्यात येईल, असे शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर (Deepak Kesarkar) यांनी जाहीर केले.

विद्यार्थ्यांच्या हिताचा निर्णप्रक्रिया सुरू असतानाच रायगड जिल्हा परिषद मराठी शाळा खरसई आणि शाळा व्यवस्थापन कमिटीला याचा विसर पडल्याचे पाहायला मिळत आहे. शाळा सुरू असताना शाळेच्या वेळेत नविन वर्ग बांधण्याचे काम ठेकेदराने सुरू ठेवले आहे तसेच त्या कामाचे साहित्य ही संबधित ठेकेदाराने बेजबाबदार पणे उघडयावर ठेवले आहे. शाळेच्या वेळेत विद्यार्थी फिरत असतात आणि खेळत असतात. त्यांना इजा होऊ नये अशी खबरदारी संबधित ठेकेदार तसेच शाळा व्यवस्थापण कमिटीने घेतली नसल्याचे निर्शनास आले आहे. त्याचाच परिणाम असा झाला की चौथी इयत्तेत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांला ईजा होऊन त्रास सहन करावा लागला आहे. पीडित विद्यार्थी लघवी च्या सुट्टी मध्ये लघवीसाठी बाहेर गेला असता टॉयलेट कडे जाणारा जो रस्ता आहे त्याच रस्त्यामध्ये हे सळी कट करण्याचा काम सुरू होते आणि कामगाराच्या हातातून एक सळीचा तुकडा निसटला आणि ती सळी विद्यार्थ्यांच्या गळ्यात गुसली. ही दुखापत एवढी गंभीर होती की त्या मुलाला तातडीने हॉस्पिटलमध्ये घेऊन जावे लागले शिक्षकांच्या धावपळीमुळे योग्य त्या वेळेत आणि उपचार मिळाल्याने विद्यार्थी सुखरूप आहे.
सदरच्या घटनने विद्यार्थी शाळेत सुखरूप आहेत का हा प्रश्न निर्माण झाला आहे. संबधित ठेकेदारावर कठोर कारवाही करण्याची मागणी पालकवर्गाकडून करण्यात येत आहे. तसेच शाळेच्या आजी माजी विद्या्थ्यांसह पालकांनी संतप्त प्रतिक्रिया देत काही प्रश्न उपस्थित केले आहेत. 
१) खेळाचे मैदान जेसीबी च्या साहाय्याने उध्वस्त करत त्याठिकाणी नवीन बांधकाम करणे यामागे कारण काय.??
२) शाळेच्या आवारात एवढी जागा असताना पर्यायी जागेचा विचार न करता खेळाचे मैदान जेसीबी लाऊन उध्वस्त का केले गेले?
३) शाळा सुरू असताना सुरू असलेल्या कामामुळे घडलेल्या दुर्गाघटनेला जबाबदार कोण?
४) १० हून अधिक खोल्या असताना नवीन वर्गाचा घाट का?
५)शाळा सुरू असताना काम सुरू करण्याची परवानगी मिळालीच कशी?
६)पुरेसा  विद्यार्थी संख्याबळ, अपुरा स्टाफ.. त्यात अधिकच्या खोलीची गरज काय...? 

Post a Comment

Previous Post Next Post

नक्की वाचा