को. ए. सो. प्रभाकर नारायण पाटील माध्यमिक शाळा, काळसुरी येथे स्काऊट - गाईड निसर्ग निवास शिबिर संपन्न

टीम म्हसळा लाइव्ह 
को. ए. सो. प्रभाकर नारायण पाटील माध्यमिक शाळा, काळसुरीच्या भव्य प्रांगणामध्ये शुक्रवार, दि. 16 फेब्रुवारी 2024 ते रविवार, दि.18 फेब्रुवारी 2024 या दरम्यान शाळेच्या छत्रपती शिवराय स्काऊट पथक व क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले गाईड पथक यांच्या तीन दिवसीय निसर्ग निवास शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. शिबिराचे उद्घाटन शुक्रवार, दि. 16 फेब्रुवारी 2024 रोजी स. 9.30 वा. स्थानिक शाळा समिती सभापती मा. श्री चंद्रकांत बेडेकर साहेब यांच्या अध्यक्षतेखाली माजी अध्यक्ष - काळसुरी ग्रामसेवा मंडळ, काळसुरी यांच्या शुभहस्ते श्रीफळ वाढवून करण्यात आले.
याप्रसंगी काळसुरी ग्रामपंचायत सरपंच मा. श्री. राजेंद्र घोसाळकर साहेब, वारळ ग्रामपंचायत सरपंच मा. सौ. कविता ताई पेरवी मॅडम  व काळसुरी उपसरपंच मा. सौ.विनयाताई पेरवी मॅडम हे विशेष अतिथी उपस्थित होते. त्याचबरोबर स्थानिक शाळा समिती सदस्य मा. श्री. स्वप्निलशेठ बिराडी साहेब, मा. श्री.गोपीनाथ चव्हाण साहेब, ग्रामपंचायत सदस्या  मा.सौ. शारदाताई पाटील मॅडम, पोलीस पाटील मा.श्री. मनोहर वारगे साहेब, काळसूर ग्रामसेवा मंडळ, मुंबई चे उपाध्यक्ष मा. श्री. किसन पाटील साहेब, शिक्षक पालक संघाचे उपाध्यक्ष मा.श्री. दयानंद नाक्ती साहेब,  पालक मा. श्री. चंद्रकांत काणेकर ( मेंदडी ), शाळेचे माजी सेवक मा.श्री.रंजन नाक्ती सर, काळसुरीतील सामाजिक कार्यकर्त्या सौ. अस्मिता म्हात्रे, सौ. अस्मिता घोसाळकर, श्रीम. पार्वती नाक्ती, पालक सौ. सुरेखा पाटील, सौ. शीतल भोपी व अन्य मान्यवर उपस्थित होते. या शिबिरासाठी साठी शाळेतील स्काऊट - गाईड विषयाचे संस्थापक व माजी मुख्याध्यापक मा.श्री. बोराटे सर, स्थानिक शाळा समिती सदस्य मा. श्री.गौऱ्या डांगे साहेब, मा. श्री. मधुसूदन पाटील साहेब, मा. श्री. अवधूत पाटील साहेब, श्रीम. शालिनीताई नाक्ती मॅडम, माजी विद्यार्थी संघ अध्यक्ष तथा अध्यक्ष काळसुर ग्रामसेवा मंडळ, मुंबई मा.श्री.किशोर सावकार साहेब यांनी शुभेच्छा दिल्या. उपस्थित मान्यवरांनी विद्यार्थ्यांना शिबिरासाठी शुभेच्छा दिल्या व मार्गदर्शन केले. उद्घाटन सोहळ्याप्रसंगी शोभायात्रा आयोजित करण्यात आली. यामध्ये स्काऊट गाईड विद्यार्थ्यांनी स्वच्छ भारत अभियान तसेच भारतातील विविध संस्कृतींचे प्रदर्शन केले. तीन दिवसीय शिबिरामध्ये स्काऊट मास्तर श्री. किरण चाळके सर यांच्या नेतृत्वामध्ये स्काऊट गाईड विषया अंतर्गत असणाऱ्या विविध घटक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले. स्वसंरक्षण, निसर्गातील टाकाऊ घटकांपासून विविध उपयुक्त वस्तू बनवणे, तंबूंची उभारणी, स्वच्छता, सजावट, संचलन, बिन भांड्यांचा स्वयंपाक, रात्रीचा पौष्टिक स्वयंपाक, गाठी व बंधांचे विविध प्रकार, प्रथमोपचार, पायोनियरिंग, रात्रीच्या शेकोटी कार्यक्रमांमध्ये  स्काऊट गाईड नियम  संबंधित नाटिका व सांस्कृतिक कार्यक्रम, नकाशा वाचन व होकायंत्राचा उपयोग, शिट्ट्यांचे संकेत, मागाच्या खुणा, विविध गाणी, परिसर स्वच्छता, सर्वोत्कृष्ट स्काऊट संघ, सर्वोत्कृष्ट गाईड संघ, सर्वोत्कृष्ट स्काऊट विद्यार्थी, सर्वोत्कृष्ट गाईड विद्यार्थीनी, सर्वोत्कृष्ट flag pole, सर्वोत्कृष्ट चूल, सर्वोत्कृष्ट शोभायात्रा  अशा विविध बाबींचा समावेश होता व संबंधित प्रशिक्षण विद्यार्थ्यांना दिले गेले. या शिबिराला सामाजिक व शैक्षणिक क्षेत्रातील विविध व्यक्तींचा मोठ्या प्रमाणात प्रतिसाद लाभला. काळसुरी, वारळ, रोहिणी, आडी ठाकूर, तुरुंबाडी, पंचक्रोशीतील ग्रामस्थ, पालक, माजी स्काऊट गाईड विद्यार्थी विद्यार्थिनी यांनी शिबिराला भेट दिली. 
रात्रीच्या शेकोटी कार्यक्रमासाठी काळसुरी ग्रामपंचायत सदस्य मा. श्री. राजेंद्र नाक्ती साहेब, रोहिणी गाव अध्यक्ष मा.श्री. सुनील पाटील साहेब व तुरुंबाडी येथील मा.श्री.अमर वैद्य साहेब तसेच माजी विद्यार्थी व पालक यांची विशेष उपस्थिती होती. रायगड जिल्हा परिषद शाळा, बनोटी येथील उपक्रमशील शिक्षक मा.श्री. जयसिंग बेटकर सर यांच्या कब बुलबुल  इ.पहिली ते चौथीच्या पथकाने सुद्धा शिबिराला भेट देऊन शिबिराची माहिती घेतली व आनंद लुटला. दरम्यान शिबिराच्या दुसऱ्या दिवशी गट समन्वयक BRC म्हसळा चे मा. कौचाली जनाब यांनी शिबिराला भेट देऊन शिबिरातील विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. 
म्हसळा तालुका गटशिक्षणाधिकारी मा.
श्री. संतोष दौंड साहेब तसेच, प्रशासन अधिकारी - BDO कार्यालय मा. श्री.चौधरी साहेब, विस्तार अधिकारी मा. श्री. जगदीश घोसाळकर सर व मा. श्री. दिपक पाटील सर, BRC - म्हसळा यांनीदेखील शिबिराला भेट देऊन शिबिरातील स्काऊट आणि गाईड यांना शुभेच्छा देऊन मार्गदर्शन केले. रविवार, दि.18 फेब्रुवारी 2024 रोजी शिबिराचा समारोप करण्यात आला. या तीन दिवसीय शिबिरासाठी शाळेतील  सेवक श्री. डावखर सर, श्री. कांबडी सर, श्री. पाडवी सर, श्री. दर्गे सर, श्री. कदम सर यांनी अथक प्रयत्न केले व विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. शाळेचे मुख्याध्यापक मा.श्री. चौरे सर यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व शिक्षक पूर्णवेळ विद्यार्थ्यांसोबत शिबिरामध्ये उपस्थित होते. या सर्व शिक्षकांचे  मुख्याध्यापक यांनी कौतुक व अभिनंदन केले आहे. स्काऊट मास्तर श्री.चाळके सर यांनी सर्व सहकारी शिक्षक, मुख्याध्यापक, स्थानिक शाळा समिती, पालक वर्ग, शिबिराला साऊंड सिस्टीम देणाऱ्या मा.श्री. प्रवीण घोसाळकर साहेब यांनी केलेल्या सहकार्याबद्दल त्यांचे आभार व्यक्त केले. 

Post a Comment

Previous Post Next Post

नक्की वाचा