Sant nirankari mission : "स्वच्छता ही सेवा" अभियानमध्ये संत निरंकारी मिशनचा सहभाग



म्हसळा : वार्ताहर

सद्गुरु माता सुदीक्षाजी महाराज यांच्या कृपाशीर्वादाने सम्पूर्ण भारत वर्षात रक्तदान शिबिर, आरोग्य शिबीर, वृक्षारोपण, स्वच्छता अभियान या माध्यमातून समाज उपयोगी संदेश देत मानव हिताच्या कार्यात संत निरंकारी मिशन नेहमीच अग्रेसर राहिले आहे.

भारत सरकारने राष्ट्रपिता महात्मा गांधीजी यांच्या जयंतीनिमित्त आदरांजली वाहण्यासाठी 'स्वच्छता ही सेवा' या अभियानांतर्गत एक तारीख, एक तास, एक साथ श्रमदान करण्याचे आवाहन केले. याच अनुषंगाने नगरपंचायत म्हसळा यांनी  संत निरंकारी मंडळाच्या स्थानिक शाखा खरसईकडे सदर अभियानामध्ये सहभागी होण्याची विनंती केली. स्वच्छता अभियानचे स्वागत करत निरंकारी भक्त देखील या अभियानात सामील  झाले. यावेळी म्हसळा शहरातील एसटी स्टॅण्ड, ग्रामीण रुग्णालय, बाजारपेठ या ठिकाणी स्वच्छता करण्यात आली. 

यावेळी बोलताना नगर पंचायतीचे मुख्याधिकारी विठ्ठल राठोड म्हणाले की, संत निरंकारी मिशन म्हसळा तालुक्यात स्वछता व समाजोपयोगी कार्यात नेहमीच अग्रेसर असते. आम्ही केलेल्या विनंतीचा स्वीकार करून अभियानामध्ये सहभागी झाल्याबद्दल व नियोजनबद्ध स्वछता करून सहकार्य केल्याबद्दल त्यांनी मिशनचे आभार व्यक्त केले.
  
यावेळी निरंकारी मिशनच्या खरसई ब्रॅंच मधील सेवादल अधिकारी, सेवादल सदस्य व म्हसळा, कांदलवाडा, खरसई, पाभरे आदी भागातून भक्तगण मोठया संख्येने उपस्थित होते. तसेच  म्हसळा नगर पंचायतीचे मुख्याधिकारी विठ्ठल राठोड, नगराध्यक्ष संजय कर्णिक, उपनगराध्यक्ष संजय दिवेकर, पोलीस निरीक्षक संदीपान सोनावणे आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते.

Post a Comment

Previous Post Next Post

नक्की वाचा