तळा:किशोर पितळे
रायगडजिल्ह्यातील अनेक रुग्णांना डायलिसि स करण्यासाठी मोठमोठ्या शहरांत जावे लागत होते.हि अतीशय खुप खर्चिक बाब असून सामान्यांना परवडणारी नाही.अशा रुग्णांना आठवडा पंधरवड्यात दुषित रक्त बदलावे लागतेअशा रुग्णांचा विचार करुन हि सुविधा आता रायगड जिल्ह्यातील रोहा, पेण, कर्जत आणि श्रीवर्धन या तालुक्यातील उपजिल्हा रुग्णालयात सुरू होणार असून राज्याच्या महिला व बालकल्याण मंत्री आदिती तटकरे यांनी रायगडच्या तत्कालीन पालकमंत्री असताना हे डायलिसिस केन्द्र उभारण्यासाठी विशेष पाठपुरावा केला होता.जेणे करून रायगड जिल्ह्यातील रुग्णांना तालुक्याच्या ठिकाणी ही सुविधा मिळेल त्याला आता यश आले असून या ठिकाणी रुग्णांना सवलती दरामध्ये डायलिसिस केले जाणार आहे.प्रत्येकी सहा बेडचे अद्यावतडायलिसिस केन्द्र उभारण्यासशासनाचीमंजुरी मिळाली आहे.रुग्णांचाकल शासकियरुग्णालयात असून अनेक पेशंट अलिबाग येथे येत असून अधिक ताण पडत असल्याने तालुक्याच्या ठीकाणी सोय करण्याला मंजूरी मिळाली आहे.या डायलिसिस मशिनद्वारे अशुध्द रक्त काढून अशुध्द घटक,क्षार, अतिरीक्त पाणी बाहेर काढले जातात व मशीन द्वारे शुध्द करुन पुन्हा शरीरात सोडले जाते मुत्रपिंड निकामी रुग्णांना ही एकमेव योग्य प्रक्रीया असून रुग्णांना दिलासा मिळणार आहे.
"रोहा,कर्जत,पेण, श्रीवर्धन. या ठीकाणी डायलिसिस ची परवानगी दिली आहे. या ठिकाणी मोफत डायलिसिस केले जाणार आहे. एक,दोन महिन्यांत डायलिसिस केंद्र सुरु होईल यांचा रुग्णांनी लाभ घ्यावा."
डाॅ.अंबादास देशमाने, जिल्हा शल्य चिकित्सक जिल्हा सामान्य रुग्णालय अलिबाग
Post a Comment