म्हसळा - रायगड
जनसेवा हिच ईश्वरसेवा असल्याने ग्रामविकास जनसेवा मंडळ खारगावखुर्द सकलप येथील स्वच्छतेचा संदेश देणाऱ्या स्वयंसेवी नागरिकांनी कर्तव्य सांभाळून गावातील जोड रस्ते,शेतीकडे जाणारे रस्ते, पाणवठा, गणपती विसर्जनघाट रस्त्यांची सफाई केली.निसर्ग चक्रीवादळात नासधुस झालेल्या प्रवासी स्थानकाचे तुटलेले पत्रे दुरुस्ती व स्वच्छता,स्मशानभूमी स्वच्छता आदी कामे करून ग्राम विकास सेवा मंडळाने स्वच्छतेचे महत्व पटवून दिले या स्तुत्य मोहिमेत सहभागी झालेल्या स्वयंसेवी ग्रामस्थांचे उपसरपंच नरेश मेंदडकर यांनी स्वागत करून त्यांचा शाल श्रीफळ देऊन येथोचीत सन्मान केला.स्वच्छता मोहिमेत माजी सभापती महादेव पाटील,समाजसेवक कृष्णा म्हात्रे,चंद्रकांत कांबळे,ॲड.मुकेश पाटील,बाळा मेंदडकर,मनोहर पाटील,योगेश मेंदडकर,गोविंद म्हात्रे, जयवंत खोत,विश्वास खोत,अशोक कांबळे,सुभाष चव्हाण,सुनील मेंदडकर,मंगेश म्हात्रे,नारायण म्हात्रे,अनंत कांबळे,पांडुरंग खोत आदीनी सहभाग घेतला होता.मंडळ सदस्यांनी श्री गणरायाला साकडे घालताना या पुढेही मंडळा तर्फे गावाची सातत्य पुर्ण सेवा घडू दे असे साकडे घातले.स्वयंसेवी मंडळ राजकारण विरहित असून फक्त गावाची सेवा हीच ईश्वरसेवा समजुन कार्यरत झाला असल्याचे माजी सभापती महादेव पाटील यांनी माहिती देताना सांगीतले.मोहिमेचे तालुक्यांतील गाव स्तरातून कौतुकाचा वर्षाव होत आहे.प्रत्येक गावात अशा प्रकारे स्वच्छता मोहीम राबविल्यास गावाची स्वच्छता राहण्यास मदत होईल राहील.खारगावखुर्द सकलप ग्रामविकास जनसेवा मंडळाचा आदर्श घेण्याची प्रतिक्रिया माजी सभापती महादेव पाटील यांनी सत्कार समारंभावेळी मनोगत व्यक्त करताना सांगितले.
Post a Comment