ganeshnagar mhasla : गणेशनगरच्या महिला जोपासत आहेत पारंपारिक नृत्य कलेचा वारसा



बोर्लीपंचतन | मकरंद जाधव

गणेशोत्सव हा समस्त कोकणवासीयांसाठी जिव्हाळ्याचा विषय.साहेबांनी सुट्टी देवो अगर न देवो पोटापाण्यासाठी मुंबईमध्ये काम करणारा कोकणातला चाकरमानी काहीही करून गणेशोत्सवात दंग होण्यासाठी आपल्या कुटुंबकबिल्यासह हमखास गावाला येणारच.
या गणेशोत्सवादरम्यान वर्षानुवर्ष गावागावात उत्साहपूर्ण वातावरणात घरोघरी सादर होणाऱ्या विविध प्रकारच्या लोककलांच प्रमाण जरी झपाट्याने कमी झालं असलं तरी अशीच एक परंपरा गेली ३५ वर्षे जपणारं गाव म्हणजे म्हसळा तालुक्यातील गणेश नगर.
या गावातल्या सावित्री महिला मंडळाने आपली पारंपरिक नाचाची परंपरा मनोभावे जपली असून गणेशोत्सवादरम्यान घरोघरी जाऊन या महिला मोठ्या उत्साहाने आपली नाचाची कला सादर करीत असतात.
आधुनिकतेच्या नावाखाली आणि मोबाईलच्या अतिरेकी वापराने आपल्या पारंपारिक कलांचा हरवत चाललेला प्राचीन वारसा जोपासण्याबरोबरच पुढच्या पिढीला हा वारसा कळावा या उद्देशाने आपली पारंपरिक कला जपणाऱ्या गणेश नगर गावातील सावित्री महिला मंडळाचं कौतुक करावं तेवढं थोडं आहे.

Post a Comment

Previous Post Next Post

नक्की वाचा