म्हसळे तालुक्यातील कुडतुडी-ढोरजे मार्गांवर वाढलेल्या वृक्ष, झूडपे-वेली यांच्या फांद्यामुळे अपघाताची शक्यता
म्हसळा / प्रतिनिधी
मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेतून साकारलेल्या ढोरजे ते कुडतुडी- गौळवाडी रस्त्यावर पावसाळ्यात दुतर्फा वाढलेल्या वृक्षाच्या फाद्या, वेली, झूडपे यामुळे एसटी, बाईकस्वार, चारचाकी वाहने चालवीतांना अडथळा निर्माण होत असून काही अपघातही झाले आहेत. शिवाय या भागात वाघ, डुकर, साप आदी जंगली जनावरांचा वावर आढळून येतो आहे, मनुष्यहानी। होण्यापूर्वीच या रस्त्याची देखभाल करणारे संबंधित सरकारचे सार्वजनिक बांधकाम खाते, वन खाते वाढलेल्या फांद्या, वेली यांची छाटणी करण्याचे औदार्य दाखवतील काय अशी विचारणा या भागातील नागरिक करीत आहेत.
Post a Comment