गणेश प्रभाळे
दिघी : उद्धव ठाकरे तुम आगे बढो हम तुम्हारे साथ है अशा घोषणा देत श्रीवर्धन शहरात शिवसेनेतर्फे रविवारी भव्य रॅली काढण्यात आली. यात शेकडो शिवसैनिक सहभागी झाले होते. यावेळी असंख्य मुस्लिम बांधवांनी शिवसेनेत प्रवेश केला.
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) श्रीवर्धन तालुका तर्फे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना समर्थन देण्यासाठी तालुक्यातील निष्ठावंत शिवसैनिकांची भव्य बाईक रॅली आयोजित करण्यात आली. श्रीवर्धन एसटी स्टँड ते नारायण पाखाडी ते सोमजाई मंदिर पर्यंत निघालेल्या या रॅलीच्या वेळी दिघी, भावे, आरावी, रानवली, जसवली, कुडकी तसेच श्रीवर्धन मोहल्ला येथील मुस्लिम समाज बांधवांनी मोठा सहभाग नोंदवला.
यावेळी कार्यकर्त्यांनी उद्धव ठाकरे यांच्या शिवसेना गटामध्ये प्रवेश करत पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या पाठीशी निस्वार्थपणे ठाम उभे असल्याचे दाखवून दिले. या कार्यक्रमाला जिल्हाप्रमुख अनिल नवगणे, जिल्हा संपर्क प्रमुख संजय कदम, माजी आमदार तुकाराम सुर्वे, उपजिल्हाप्रमुख नंदू शिर्के यांच्यासह तालुक्यातील असंख्य पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
Post a Comment