वडवली मध्ये संत निरंकारी मिशनतर्फे रक्तदान शिबिराचे आयोजन

वडवली  मध्ये संत निरंकारी मिशनतर्फे रक्तदान शिबिराचे आयोजन


श्रीवर्धन : प्रतिनिधी
              सदगुरु माता सुदीक्षाजी महाराज यांच्या असीम कृपेने संत निरंकारी मिशन (रजि.) दिल्ली, शाखा- वडवली , भरडखोल, श्रीवर्धन, खरसई  व संदेरी यांच्या वतीने शनिवार 27 मे 2023 रोजी सकाळी 9.00 ते दुपारी 2.00 वाजेपर्यंत संत निरंकारी सत्संग भवन वडवली येथे  रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.
          सदर रक्तदान शिबिरामध्ये रक्तसंकलन शासकीय रक्तपेढी आलिबाग-रायगड यांच्यामार्फत होणार आहे. संत निरंकारी मंडळामध्ये रक्तदान शिबिराची ही शृंखला 23 ऑक्टोबर 1986 पासून सुरू झाली असून दरवर्षी 24 एप्रिल मानव एकता दिवस या दिवसापासून संपूर्ण विश्वात रक्तदान शिबिराचे आयोजन केले जाते. 
          संत निरंकारी मिशनचा रक्तदानाचा हा सामाजिक पैलू मनुष्यमात्राच्या मनामध्ये मानवतावादी भावनांना उद्योन्मुख करत आहे. तरी रक्तदान शिबिरासाठी जास्तीत जास्त रक्तदात्यांनी उपस्थित राहून रक्तदान या महान मानवी कार्यामध्ये सहभागी होण्याचे आवाहन खरसई (रायगड) झोन 40-अ चे क्षेत्रीय प्रभारी  प्रकाश म्हात्रे यांनी केले आहे.

हेही अवश्य वाचा..

Post a Comment

Previous Post Next Post

नक्की वाचा