पाण्याच्या स्वच्छतेबरोबरच, मनाची स्वच्छताही आवश्यक- सदगुरू माता सुदीक्षाजी महाराज

पाण्याच्या स्वच्छतेबरोबरच, मनाची स्वच्छताही आवश्यक- सदगुरू माता सुदीक्षाजी महाराज

‘स्वच्छ जल, स्वच्छ मन’
निरंकारी सद्गुरुंच्या शुभहस्ते ‘प्रोजेक्ट अमृत’चा शुभारंभ

पाण्याच्या स्वच्छतेबरोबरच, मनाची स्वच्छताही आवश्यक
- सद्गुरु माता सुदीक्षाजी महाराज

श्रीवर्धन : प्रसाद पारावे 

स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षाचे औचित्य साधून सद्गुरु माता सुदीक्षाजी महाराज आणि निरंकारी राजपिताजी यांच्या शुभहस्ते आज सकाळी 8.00 वाजता ‘अमृत परियोजने’ अंतर्गत ‘स्वच्छ जल स्वच्छ मन’ अभियानाचा शुभारंभ यमुना नदीच्या छट घाटावर (आय.टी.ओ.) येथून करण्यात आला. याबरोबरच देशभरातील 27 राज्ये व केंद्रशासकीय प्रदेशांतील 730 शहरांमध्ये हे अभियान एकाच वेळी सुरु करण्यात आले. 
बाबा हरदेवसिंहजी यांच्या शिकवणूकीतून प्रेरणा घेत सद्गुरु माता सुदीक्षाजी महाराज यांच्या दिव्य निर्देशनानुसार या ‘अमृत परियोजने’चे आयोजन करण्यात आले.  
याप्रसंगी संत निरंकारी मिशनचे समस्त अधिकारीगण, केन्द्रीय एवं राज्य सरकारमधील मंत्री, मान्यवर अतिथि तसेच हजारोंच्या संख्येने निरंकारी स्वयंसेवक आणि सेवादलचे सदस्य या कार्यक्रमामध्ये सहभागी झाले. कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण मिशनच्या वेबसाईटवरुन करण्यात आले ज्याचा लाभ देशविदेशातील निरंकारी भक्तगणांनी घेतला. 

या परियोजनेचा शुभारंभ करताना सद्गुरु माता सुदीक्षाजी महाराज यांनी पाण्याचे अनन्यसाधारण महत्व समजावून सांगितले तसेच ईश्वराने आपल्याला हे अमृतरुपी जल दिले आहे त्याचा निर्मळ स्वरुपात सांभाळ करणे हे आपले परम कर्तव्य असल्याचे सांगितले. पाणी निर्मळ होण्याबरोबरच मनेही निर्मळ होण्याची आवश्यकता असल्याचे प्रतिपादन करुन सद्गुरु माताजी म्हणाल्या, की आपण संतांसारखे जीवन जगून परोपकाराचे कार्य करत राहायचे आहे.
याचाच भाग म्हणून श्रीवर्धन तालुक्यातील दिवेआगर येथील समुद्रकिनारी स्वच्छता मोहीम राबवण्यात आली .

रायगड क्षेत्र 40 अ मधील  सेक्टर खरसई च्या खरसई, भरडखोल, श्रीवर्धन, वडवली व संदेरी ब्रॅंच अंतर्गत दिवेआगर समुद्रकिनाऱ्यालगतच्या परिसरात स्वच्छता मोहीम राबवली. यावेळी दिघी सागरी पोलीस ठाण्याचे नवनियुक्त सहा पोलिस निरीक्षक डॉ प्रसाद ढेबे, जेष्ठ राजकीय नेते महमद मेमन, दिवेआगर ग्रामपंचायत चे माजी सरपंच उदय बापट, सदस्य देवेंद्र नार्वेकर, क्षेत्रिय प्रबंधक म. प्रकाश म्हात्रे जी यांच्यासह दिवेआगर ग्रामपंचायत सदस्य,  स्थानिक निरंकारी सेवादल तसेच अन्य निरंकारी भक्तगण मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.  बोट व्यावसायिक भाऊ साळुंखे व  ग्रामपंचायत कडून सर्व संत निरंकारी भक्तजणांना नाश्ता आणि इतर स्वच्छता साहित्य देण्यात आले. दोनशे हुन अधीक जणांनी या मोहिमेत भाग घेतला. पोलीस अधिकारी ढेबे, उदय बापट आणि महमद मेमन यांनी संत निरंकारी मंडळाच्या या स्वच्छता मोहिमेत सहभागी होत कौतुकही केले.
या परियोजनेमध्ये जास्तीत जास्तीत युवावर्गाचा सक्रिय सहभाग होता. कार्यक्रमामध्ये केवळ पर्यावरणपूरक उपकरणांचाच वापर करण्यात आला. प्लास्टिक बॉटल किंवा थर्माकॉल इत्यादिंच्या वस्तू पूर्णपणे प्रतिबंधित होत्या. 
कार्यक्रमाच्या समापन सत्रामध्ये सहभागी झालेल्या अतिथीगणांनी मिशनच्या कार्याचा गौरवपूर्ण शब्दांमध्ये उल्लेख केला. सद्गुरु माताजींचे मनापासून आभार व्यक्त करत जल संकटापासून बचाव होण्यासाठी ‘जल संरक्षण’ व ‘जलाशयांची स्वच्छता’ यांसारख्या कल्याणकारी परियोजनांना निरंकारी मिशनकडून जे क्रियात्मक रूप दिले आहे ते निश्चितपणे समाजोत्थानाच्या दिशेने एक महत्वपूर्ण पाऊल आहे, असे ते म्हणाले. संत निरंकारी मिशन वेळोवेळी अशाच स्वरूपाच्या अनेक परियोजनांमध्ये सक्रिय रूपाने सहभागी होत आले आहे त्यामध्ये पर्यावरण संरक्षणासाठी राबविण्यात आलेली ‘वननेस वन परियोजना’ आणि आता जल संरक्षणासाठी राबविली जात असलेली ‘अमृत परियोजना’ उल्लेखनीय आहेत.

Post a Comment

Previous Post Next Post

नक्की वाचा