घोणसे घाट अपघात रोखण्याचे उपाययोजना कामी शासन अधिकारी,पदाधिकारी आणि ग्रामस्थ यांनी केली अपघात स्थळाची संयुक्त पाहणी.
म्हसळा - अंकुश गाणेकर
दिघी पुणे राष्ट्रिय मार्गावरील माणगाव कडून म्हसळा कडे जाताना म्हसळा तालुक्यातील ५ किमी अंतरावर घोणसे घाटातील शेवटच्या तीव्र उतार वळणावर मोठ्या प्रमाणात अपघाती घटना घडत आहेत.अपघात रोखण्यासाठी काही तरी ठोस उपाययोजना करण्यात याव्यात अशी मागणी म्हसळयातील नागरिकांनी खासदार सुनिल तटकरे यांच्या कडे केली असता खासदार तटकरे यांनी दिनांक १२ ऑक्टोंबर २०२२ रोजी रायगड जिल्हा अधिकारी डॉ.महेंद्र कल्याणकर यांचे समावेत राजस्व सभगृहात म्हसळा,श्रीवर्धन महसुल विभाग,एम.एस.आर.डी.सी., बांधकाम विभाग एजंसी,आर.टी.ओ.पेण आणि स्थानिक पत्रकार,लोकप्रतिनिधी यांचे समावेत तातडीची बैठक घेतली होती याच बैठकीत खासदार तटकरे यांनी घोणसे घाट अपघात स्थळाची तसेच म्हसळा शहर पर्यायी मार्ग व्यवस्था दुरूस्ती व सुधारणा कामी दिनांक १४ ऑक्टोंबर रोजी प्रत्यक्ष पहानी करून ठोस उपाययोजना करण्यात याव्यात असे आदेश वजा सुचना दिल्या होत्या.त्यांनी केलेल्या आदेशाची वरील सर्व शासकिय, निमशासकीय यंत्रणेने दखल घेऊन घोणसे घाट अपघाती स्थळी उपविभागीय अधिकारी अमित शेडगे, एम.एस.आर.डी.सी.चे अधिकारी एस.एस.गावीत,बांधकाम विभाग एजंसी अधिकारी नंदेश नागोल,पोलिस उप विभागीय अधिकारी प्रशांत स्वामी, ट्रॅफिकचे पी.आय.सुवर्णा पत्की,आर.टी.ओ.अधिकारी महेश देवकाते, मुख्याधिकारी मनोज उकिर्डे, पोलिस अधिकारी संदीपान सोनवणे, बांधकाम कार्यकारी अभियंता एम.आर.नामदे, सार्वजनिक बांधकाम उप अभियंता पी.एस.राऊत, निवसी नायब तहसिलदार गणेश तेलंगे, रस्ता विकासक जे.एम.म्हात्रे कं.अभियंता जाधव, प्रसाद बडे, तालुका लोकप्रतिनिधी महादेव पाटील, समीर बनकर, सरपंच रेश्मा काणसे, नगराध्यक्ष असहल कादीरी, उपनगराध्यक्ष सुनिल शेडगे, नगर सेवक संजय कर्णिक, नासीर मिठागरे, मुन्ना पानसरे, संजय दिवेकर, माजी सरपंच राजु लाड, शाहिद उकये, मुद्द्दिक इनामदार, सचिन महामुनकर, अमित महामुनकर, निलेश मांदाडकर स्थानीक रहिवासी यांनी संयुक्तिकपणे घोणसे घाट अपघात स्थळाची तसेच म्हसळा शहर पर्यायी मार्ग व्यवस्था दुरूस्ती व सुधारणा कामी पाहणी केली. या वेळी उपस्थित अभ्यासु मान्यवरांनी घाट अपघात रोखण्यासाठी मोठे सूचना फलक, रमलर, ब्रिंकलर, रीप्लेक्ट्टर, संरक्षणभिंत बांधकाम व त्याला टायर बांधणे, करो कमी करणे, झाडी आणि उंच डोंगर छाटणे आदी उपाय योजना सुचवल्या असता या सर्व बाबींची अंमलबजावणी काही दिवसांतच करण्यात येणार असल्याचे उप विभागीय अधिकारी अमित शेडगे यांनी माहिती देताना सांगितले. त्याच बरोबर खासदार सुनिल तटकरे यांनी येत्या आठ दिवसांत घोणसे घाट मार्ग दुरूस्ती कामी तातडीने उपाययोजना कराव्याचे आदेश दिले असता घटनास्थळी अवघ्या दोन दिवसांत रस्ता दुरुतीचे कामाचे अंमलबजावणीला सुरूवात झाली असल्याचे दिसून आले.
Post a Comment