विरारमध्ये कडधान्यांपासून विठ्ठल साकारला




वसई तालुक्यातील भाताणे येथील कौशिक दिलीप जाधव यांनी कडधान्यांचा उपयोग करून विठू माऊली साकारली आहे. आषाढी एकादशीच्या पार्श्वभूमीवर त्यांनी ही कलाकृती साकारली आहे.

कौशिक जाधव यांनी कलाकृती अवघ्या 20मिनिटांत पूर्ण केली. आहे. त्यासाठी त्यांनी कडधान्यानमध्ये तूरडाळ, मसूरडाळ, मुगडाळ, चवळी, वाटाने, चणे व अन्य कडधान्यांचा वापर केला आहे.

देव चरा चरा मध्ये आहे, हे कौशिक जाधव यांच्या कलाकृतीमधून दिसून येत आहे. तसेच चित्रकार कौशिक जाधव यांनी तांत्रिक उपकरणातून, पेन पट्टी पेन्सिलच्यां साह्याने ही विठूमाऊली साकारली होती. पानांलातून अशा अन्य 12 वेगवेगळ्या प्रकारे विठू माऊली साकारले आहेत.

Post a Comment

Previous Post Next Post

नक्की वाचा