संजय खांबेटे : म्हसळा
नवऱ्याजवळ पटत नाही म्हणुन तीन महिने माहेरी वास्तव्यास गेलेली असताना २४ वर्षाचे विवाहित युवतीने गळफास लाऊन आत्महत्या केल्याची घटना म्हसळा तालुक्यातील मेंदडी गणेशनगर येथे गुरुवार दि.१० मार्च २०२२ रोजी सायंकाळी ६ वाजताचे दरम्यान घडली. प्रणाली निलेश नाक्ती, रा खरसई हिने ओढणीने गळफास घेऊन आत्महत्या केलेल्या घटनेची फिर्याद मुलीचे वडील गोपाळ अर्जुन पाटील वय ४५ वर्षे,रा.मेंदडी गणेशनगर यांनी म्हसळा पोलीस ठाण्यात दिली असता पोलिसांनी गुन्हा रजी नं १८/२०२२ भा.द.वी.३०६ , ३४ प्रमाणे नोंद केली. म्हसळा पोलिसांनी अधिक माहिती दिली असता प्रणाली हिचे खरसई येथील निलेश नाक्ती याचे बरोबर समाज रीती रिवाजा प्रमाणे विवाह झाला होता.वेळोवेळी दोघांचे एकमेकांजवळ पटत नव्हते. मागील ३ महिन्यापासुन प्रणाली मेंदडी येथे तिच्या माहेरी राहायला गेली होती. दिनांक १० मार्च रोजी प्रणाली हिने घरात कोणीही नसताना घराचे छताचे लाकडी भालास ओढणीने गळफास लाऊन आत्महत्या केली. घटनेचा तपास स.पो.नी.उध्दव सुर्वे जातीने करत असताना प्रणाली हिने मृत्यूपूर्वी लिहून ठेवलेल्या चिठ्ठीत तीचा सासरी छळ होत आसावा असा संशय पोलीसांना आल्याने म्हसळा पोलीसानी मुलीचा नवरा नीलेश मालजी नाक्ती वय ३० व सासरे मालजी धोंडू नाक्ती वय ६८ याना अटक केली आसल्याचे सपोनी उध्वव सुर्वे यानी सांगितले.
Post a Comment