म्हसळा निकेश कोकचा
म्हसळा तालुक्यातील शिक्षकांची शिक्षक परिषद संघटनेची नूतन कार्यकारिणी जाहीर करण्यात आली.महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेचे राज्य अध्यक्ष श्री.राजेश सुर्वे सर व जिल्हा अध्यक्ष श्री.संजय निजपकर सर यांच्या मार्गदर्शखाली नूतन कार्यकारिणी ची निवड झाली.संघटनेचे तालुका अध्यक्ष म्हणून श्री.नितीन माळीपरगे यांची तिसऱ्यांदा सर्व सभासदांच्या एकमताने निवड करण्यात आली.संघटनेच्या कार्यवाह पदी श्री.अशोक सहाणे सर,कार्याध्यक्ष पदी श्री.प्रशांत मोरे सर,कोषाध्यक्षपदी श्री.एजाज सय्यद सर,कार्यालयीन प्रमुख पदी श्री.संदीप जाधव सर,उपाध्यक्ष पदी श्री.प्रदीप बिरादार सर,व श्री.नरेंद्र ढेरे सर यांची निवड करण्यात आली.
सदर निवडीसाठी निरीक्षक म्हणून जिल्हा संघटनेचे कार्यालयीन प्रमुख श्री.जितेंद्र बोडके सर,माणगाव तालुका अध्यक्ष श्री.गणेश निजापकर सर,श्री.भोजने सर,श्री.अंधेरे सर,श्री.मंगेश जाधव सर,उपस्थित होते.संघटनेचे नूतन सर्व पदाधिकारी याना आलेल्या निरीक्षकांनी पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.अध्यक्षपदी निवड झालेले श्री.माळीपरगे सर यांनी जिल्हा कार्यकारिणीने पुन्हा एकदा जो विश्वास दाखवून माझी निवड केली त्या बद्दल जिल्हा कार्यकारिणीचे आभार मानले व आज पर्यंत शिक्षकांच्या सोडवलेल्या समस्येचा आढावा सभासदांसमोर मांडला,तसेच यापुढेही शिक्षकांच्या समस्या सोडवण्यासाठी संघटना सदैव कटिबद्ध राहील असे मनोगतात सांगितले.
Post a Comment