म्हसळा : निकेश कोकचा
जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुक पूर्वीच म्हसळ्यात शिवसेनेला मोठा धक्का बसला आहे.शिवसेनेचे माजी तालुका प्रमुख व माजी सभापती महादेव पाटील, खारगाव खुर्द ग्रामपंचायत सदस्य मुकेश पाटील व मनोहर पाटील यांनी शिवसेनेला जय महाराष्ट्र करत खा.सुनील तटकरे यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी पक्षात प्रवेश केला.यावेळी राष्ट्रवादीचे नेते अली कौचाली, जिल्हा परिषद सभापती बबन मनवे,तालुका अध्यक्ष समीर बनकर,माजी सभापती उज्वला सावंत,उप सभापती संदीप चाचले, युवक अध्यक्ष फैसल गीते,युवा नेते जमीर नजीर व पाभरे ग्रामपंचायत सरपंच अनिल बसवत उपस्थित होते.
महादेव पाटील यांनी केलेल्या पक्ष प्रवेशामुळे वरवठणे गणात जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकांमध्ये राष्ट्रवादीची ताकद वाढणार हे निश्चित आहे.
Post a Comment