जल जीवन मिशन अंतर्गत तालुक्यातील ११७६ कुटुंबियांचा हंडा डोक्यावरून उतरणार


जल जीवन मिशन अंतर्गत म्हसळा तालुक्यातील . ४ गावाना रुपये २ कोटी ३९ लक्ष १ हजाराची मंजुरी: ११७६ कुटुंबियांचा हंडा डोक्यावरून उतरणार .

संजय खांबेटे : म्हसळा 
सन २०२४पर्यंत राज्यातील ग्रामीण भागांत १ कोटी ४२ लाख ३६ हजार नळजोडण्या देण्याचे केंद्र व राज्य सरकारचे उद्दिष्ट आहे. त्याचाच भाग म्हणून रायगडच्या पालकमंत्री ना.अदीतीताई तटकरे आणि खासदार सुनिलजी तटकरे यानी म्हसळा तालुक्या तील केलटे ग्रामपंचायती मधील चंदन वाडी( रु२१ लक्ष), मांदाटणे (रु९७.२८लक्ष),साळविंडा (रु९७.६४लक्ष), तोराडी (रु२३.१८लक्ष) असे ४ गावाना रु २ कोटी ३९लक्ष१ हजाराची मंजुरी व कार्यादेश प्राप्त केले आसल्याचे ग्रा.पा.पुरवठा विभागाचे प्र.उपअभियंता युवराज गांगुर्डे यानी सांगितले.
ग्रामपंचायत केलेटे मधील चंदनवाडी या वाडीसाठी ,बोअरवेल, ३H.P.पंप व नळजोडणी  यासाठी रु२१लक्ष रुपये मंजुर आहेत,मांदाटणे योजनेमध्ये मांदाटणे,पाष्टी, पानदरे,मोरवणे ही चार गावे मोडत असून मुख्यत्वे विहीर,पंपींग,आणि पाणी लिफ्ट साठवण व वितरण हे समाविष्ट आहे. त्यासाठी रु९७ लक्ष२८हजार मंजुर आहेत.
साळविंडा ह्या योजनेत तीनही वाड्याना गुरुत्ववाहीनीने पाणी पुरवठा,बंधारा, कलेक्टींग चेंबर,साठवण टाकी हे समाविष्ट असून रू९७ लक्ष ६४ हजार मंजुर आहेत. तोराडी योजनेमध्ये विहीर,पंप साठवण टाकी या गोष्टी समाविष्ट असून रुपये २३ लक्ष १८ हजार मंजूर आहेत.जलजीवन मिशन अंतर्गत प्रत्येक घरापर्यंत नळजोड णीच्या माध्यमातून पाणी पोहचविण्याचा केंद्र व राज्य शासनाचा मुख्य हेतू आहे.जल जीवन मिशन योजनेसाठी ४५% केंद्र शासन,४५% राज्यशासन व १० % स्थानिक लोकवर्गणी असे आर्थिक नियोजन असते. जल जीवन मिशन अंतर्गत तालुक्यातील प्रशासकीय मान्यता मिळालेल्या योजनेचे नाव १) सोनधर२) कुडगाव.अंदाज पत्रक सादर झालेल्या योजना१) खारगांव (बु) २) ठाकरोली, ३)भेकऱ्याचा कोंड,४) चिचोडा तालुक्यातील अन्य १३ गावांतील योजनांचे सर्वेक्षण पूर्ण झाल्याचे समजते.

"२०२४ पर्यंत नळजोडण्यांचे हे उद्दिष्ट गाठण्यासाठी कालबद्ध कार्यक्रम आखून त्याची सर्व यंत्रणांनी युद्ध पातळीवर अंमलबजावणी करावी जल जीवन मिशन अंतर्गत उद्दिष्ट मोठे असले तरी काम पूर्ण करायचे आहे, असे निर्देश पालकमंत्री ना.आदीती ताई, खासदार सुनिल तटकरे, आणि C.E.O. डॉ. किरण पाटील यांचे आहेत, त्या दृष्टीने सातत्याने पाठपुरावा असतो".

Post a Comment

Previous Post Next Post

नक्की वाचा