गावाचा विकास झाल्याने तोरडी विकास मंच ग्रामस्थांनी केला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात जाहीर प्रवेश
संजय खांबेटे - म्हसळा
म्हसळा तालुक्यात निसर्गाच्या सानिध्यात वसलेल्या तोराडी गावात खासदार सुनिल तटकरे यांचे शुभहस्ते पालकमंत्री आदिती तटकरे यांनी मंजुर केलेल्या जलजीवन मिशन कार्यक्रम 2021-22 पाणी पुरवठा योजना भूमिपूजन,रस्ता बांधकाम उद्घाटन संपन्न झाले.राष्ट्रवादी काँग्रेसच्या माध्यमातून गावाचा सर्वांगीण विकास होत असल्याने तोराडी विकास मंच संपूर्ण ग्रामस्थांनी पक्षात जाहीर प्रवेश केला या वेळी खासदार तटकरे यांनी स्वागत करताना निसर्ग सौंदर्याने नटलेल्या म्हसळा तालुक्याला नैसर्गिक वरदानच आहे.येथे पर्यटनिय विकासा बरोबर शैक्षणिक सेवा सुविधा उपलब्ध करून देत असताना रोजगार निर्मिती करण्याचे दृष्टीने औ औद्योगीक विकासावर भर देऊन भविष्यात नवीन पिढीला स्थनिक ठिकाणी रोजगार उपलब्ध होईल असे काम करण्यात येणार असल्याचे सांगितले.गावाचा विकास साधण्यासाठी तोराडी येथिल मुंबई निवासी चाकरमानी बस करून गावाला आले याचा समाधान व्यक्त करताना हे चित्र सणासुदीला किंवा निवडणूक कालावधीत पहायला मिळतो असे आवर्जून सांगितले.या गावातील विकासाची सर्व कामे आम्ही मार्गी लावण्यासाठी कटिबद्ध असल्याचे आणि हाती घेण्यात आलेली काम लवकरच पूर्ण करण्याचे आश्वासन दिले.ग्रामस्थांनी या पुढे पक्षाचे प्रति कायम निष्ठा बाळगून सहकार्य करावे असे आवाहन केले.उत्साहात संपन्न
कार्यक्रमाला राष्ट्रवादीचे प्रदेशचिटणीस अलिशेट कौचाली,तालुका मुंबई अध्यक्ष महेश शिर्के,जिल्हा परिषद सभापती बबन मनवे,पंचायत समिती सभापती छाया म्हात्रे,उपसभापती संदिप चाचले,माजी सभापती उज्वला सावंत,माजी सभापती नाझीम हसवारे,नगराध्यक्ष असहल कादरी,उपनगराध्यक्ष सुनिल शेडगे,सरपंच अंकुश खडस,गण अध्यक्ष सतिश शिगवण,अनिल बसव,डॉ.फरीद खान पठाण,पाणी पुरवठा अभियंता युवराज गांगुर्डे,इसाक कौचाली,किरण पालांडे,गाव अध्यक्ष विजय डोंगरे,उपसरपंच वर्षा कुळे,आदि मान्यवर उपस्थित होते.
Post a Comment