नगरपरिषदेचा अजब कारभार : भिंतीवर काढण्याचे चित्र नगर परिषदेने काढले बसण्याच्या पारावर

श्रीवर्धन : संतोष चौकर

2022 स्वातंत्र्याचे अमृत महोत्सवी वर्ष साजरे करण्यात येत आहे . त्याचप्रमाणे स्वच्छता सर्वेक्षण 2022 हे अभियान देखील चालू आहे . महाराष्ट्र शासनाच्या नगरविकास खात्याकडून राज्यातील सर्व नगरपंचायती व नगरपरिषद यांना स्वच्छता सर्वेक्षण 2022 व स्वातंत्र्याचे अमृतमहोत्सवी वर्ष या निमित्त काही सन्मानचिन्ह काढून त्याची जाहिरात करण्याचे आदेश पारित करण्यात आले आहेत . श्रीवर्धन शहरातील एक रस्ता जो दिवेआगर कडे जातो व दुसरा रस्ता जीवना बंदर कडे जातो त्या ठिकाणी भलेमोठे पिंपळाचे झाड असून त्या पिंपळाच्या झाडाला गोल असे पार बांधलेले आहे . वाळवटी , दिवेआगर कडे जाणारे काही प्रवासी किंवा जीवनावंदर कडे जाणारे प्रवासी या पारावर बसलेले असतात . या सन्मान चिन्हावरती तिरंग्यामध्ये असल्याप्रमाणे हिरवा , पांढरा भगवा रंग आहे . त्याचप्रमाणे अशोक चक्र देखील काढण्यात आलेले आहे . सदर चित्र रंगवण्याचे काम चालू असताना श्रीवर्धन मधील पत्रकार संतोष चौकर यांनी त्या ठिकाणी जाऊन श्रीवर्धन नगरपरिषदेचे मुख्याधिकारी विराज लबडे यांच्या निदर्शनास सदर बाब आणून दिली होती . सदरचे चित्र भिंतीवर काढण्यास कोणतीही हरकत नाही . परंतु बसण्याच्या जागी सदरचे चित्र काढल्यानंतर त्यावरती कोणी अनवधानाने बसल्यास त्या चिन्हाचा अवमान होण्याचे शक्यता नाकारता येत नाही , परंतु श्रीवर्धन नगरपरिषद प्रशासनाने या पारावरती हे चित्र रंगवून पूर्ण केले आहे . आता याबाबत श्रीवर्धन मधील नागरिकांमधून उलटसुलट चर्चा सुरू आहेत नगरपरिषदेने स्वच्छ सर्वेक्षणची जाहिरात गावात अनेक ठिकाणी रस्त्याच्या दुतर्फा असलेल्या भितींवर चित्र काढून जरूर करावी . पण बसण्याच्या पारावर अशा प्रकारची चित्र काढू नयेत अशी मागणी नागरिकांमधून केली जात आहे .

Post a Comment

Previous Post Next Post

नक्की वाचा