टीम म्हसळा लाईव्ह
श्रीवर्धन , बागमांडला , हरिहरेश्वर , दिघी आणि म्हसळा तालुक्यातील सर्वच रुग्णांना अगदी शुल्लक आजारापासून मोठ्या आजारापर्यंत सर्वच आजारासाठी सोनोग्राफी काढण्यासाठी माणगाव , महाड आणि अन्य ठिकाणी जावे लागत असे . त्यासाठी आर्थिक आणि वेळ या दोन्ही बाजूने रुग्णांना ताण पडत असे . परंतू म्हसळा येथील अल हमद रुग्णालयात डॉ . मुश्ताक मुकादम यांच्या प्रयत्नाने सोनोग्राफी मशीन उपलब्ध झाली असून श्रीवर्धन - म्हसळा तालुक्यातील रुग्णांना आता अन्य ठिकाणी जाण्याची आवश्यकता नसून सर्व प्रकारच्या सोनोग्राफ व्यवस्था करण्यात आल्याचे डॉ . मुकादम यांनी उदघाटन प्रसंगी सांगितले . त्यांनी पुढे सांगितले कि , म्हसळा येथे महिन्यातून एकदा नामांकित सोनोग्राफी तज्ज्ञ विशेष म्हणजे शरद पवार साहेब आणि मुख्यमंत्री यांच्या नेहमी संपर्कात असणारे केईएम हॉस्पिटलचे डीन न्युरोसर्जन डॉ . आदिल छागला हे स्वतः उपलब्ध असणार असून आठवड्यातून एकदा सोनोग्राफी रेडिओलॉजिस्ट डॉ . असिफ मेमन , डॉ . प्रिन्स अलिखान ( इस्मालिया हॉस्पिटल मुंबई ) , डॉ . हासीब शेख ( अर्थो तज्ज्ञ ) , डॉ . प्रीती प्रधान ( डोळे तज्ज्ञ ) भेट देणार असून तालुक्यातील जास्तीत जास्त रुग्णांना सेवा देणार असल्याचे त्यांनी सांगितले .
Post a Comment