खोटं बोलायचे नाही झेपेल तितकाच शब्द द्यायचा हि तटकरे साहेबांची शिकवण.- ना. आदितीताई तटकरे




श्रीवर्धन. - कोरोनाच्या काळात रखडलेली काम आता होणार नाहीत. तटकरे साहेब फक्त आश्वासन देतात काम करत नाहीत असा विरोधकांकडून गैरसमज पसरवण्यात आला होता. मात्र खोटं बोलायचे नाही झेपेल तितकाच शब्द द्यायचा  खोटं वचन द्यायचे  नाही अशी खा. तटकरे साहेबांची शिकवण असल्याचं राज्यमंत्री तथा रायगड जिल्हा पालकमंत्री ना. आदितीताई  तटकरे यांनी व्यक्त केलं. श्रीवर्धनमधील बापदेव मंदिर जीर्णोद्धार भूमिपूजन, परीट समाज सामाजिक सभागृह भूमिपूजन, कुंभार समाज सामाजिक सभागृह भूमिपूजन समारंभ प्रसंगी त्या बोलत होत्या. यावेळी व्यासपीठावर नगराध्यक्ष फैसल हुर्जुक, शहराध्यक्ष जितेंद्र सातनाक, उपनगराध्यक्ष यशवंत चौलकर आदी मान्यवर उपस्थित होते. 
       कोरोनाच्या काळात वर्षभरात आपला आमदार निधी कोविडसाठीच वापरायचा आश्या सूचना होत्या. आता आमचा आमदार निधी इतर कामासाठी वापरण्यासाठी परवानगी दिली. त्यामुळे स्थानिक प्रतिनिधी म्हणून मला माझ्या आमदार निधीतून काम टाकण्याची संधी मिळाली. माझा पहिला आमदार निधी आज होत असलेल्या विकास कामांसाठी वापरला जात आहे. माझ्यासाठी अत्यंत आनंदाची असल्याचं मत ना. आदिती तटकरे यांनी व्यक्त केलं. काम होणार नाहीत असं सांगून दिशाभूल करणाऱ्या विरोधकांना आपण महत्व न देता खा. सुनील तटकरे साहेबांवर ठेवलेला विश्वास आणि  आपण पाळलेला संयम महत्वाचा आहे. निसर्गचक्री वादळात मोठं नुकसान झालं त्यामुळे विकासकाम काम चांगल्या दर्जाची व मर्यादित कालावधीत झाली पाहिजेत आश्या सूचना देखील ना. आदिती तटकरे यांनी संबंधित अधिकारी व ठेकेदारांना दिल्या.
          आपण मला निवडून दिलात त्यावेळी  विधानसभा सदस्य म्हणून काम करु अस वाटत होतं पण आदरणीय पवार साहेबांच्या कृपेने महाविकास आघाडी निर्माण झाली. आणि या महाविकास आघाडीत मला मंत्री म्हणून काम करण्याची संधी मिळाली असल्याचं मत ना. आदिती तटकरे यांनी व्यक्त केलं.

Post a Comment

Previous Post Next Post

नक्की वाचा