संजय खांबेटे : म्हसळा
म्हसळा शहरांत १० दिवसापूर्वी झालेल्या ६ साखळी घरफोंडयांचा तपास होत नाही,यामुळे नागरीकाना विशेषतः महीला वर्गाला आता असुरक्षित वाटायला लागले आहे. आपली दाग-दागिन्यां ची असणारी थोडी बहुत पुंजी सुरक्षित रहाण्यासाठी शहरांतील महीला वर्गाचा कल सुरक्षीततेच्या दृष्टीकोनातून लॉकर कडे वळला आहे. महीलाही लॉकर बाबत चौकशी करत असताना दिसत आहेत. लॉकरची सुविधा स्टेट बँक ऑफ इंडीया या राष्ट्रीयकृत बँकेत आणि महाड को ऑप अर्बन बँक या सहकारी बँकेत आहे. सर्वसाधारणपणे दोनही बॅंकेत स्मॉल,बीग,लार्ज या स्वरूपाचे लॉकर उपलब्ध आहेत. त्यांचे वार्षिक भाडे रु १००० ते रु ३६०० आसल्याचे बँक व्यवस्थापकानी सांगितले.
"आम्ही शहरातील अत्यंत मध्यवर्ती रहदारीच्या भागात असणाऱ्या मंदीर परीसरांत रहात असतो, गणेश मंदीरासमोर दोन घरफोडया झाल्या सुरक्षेच्या दृष्टीकोनातून लॉकरचा पर्याय निवडत आहोत".-श्रीमती करडे, म्हसळा
बँकांमध्ये सध्या दागदागिने आणि इतर मौल्यवान वस्तू ठेवण्यासाठी ग्राहकांना विशिष्ट अशा लॉकरची सुविधा प्रदान केली जाते.या लॉकर्समध्ये ग्राहकाच्या वस्तू अगदी सुरक्षितपणे ठेवल्या जातात. ग्राहक वस्तू गरजे प्रमाणे सोप्या पद्धतीने काढू शकतात.
बँक व्यवस्थापन
Post a Comment