महाड तालुक्यात कॉंग्रेस पक्षाला लागली गलती
कुसगाव मोहल्ला मधिल विध्यमान ग्रामपंचायत सदस्यांसह असंख्य काँग्रेस कार्यकर्त्यांनी केला मान्यवरांच्या उपस्थितीत शिवसेनेत जाहिर प्रवेश
आमदार भरतशेट गोगावले यांच्या कार्यप्रणाली वर विश्वास ठेवून शिवसेनेत प्रवेश:- बशीर पठाण
मरेपर्यंत आमदार भरतशेट गोगावले यांची साथ सोडणार नाही: नुरुद्दीन पठाण
मुस्लिम समाजाने दाखवलेला विश्वास सार्थ करून दाखवविणार
सध्या महाड तालुक्यात शिवसेना पक्षात प्रवेश करणार्यांची संख्या वाढली असून दररोज शिवसेना पक्षात प्रवेशाचा धडाका चालू आहे दोन दिवसांन पूर्वी तालुक्यातील देशमुख कांबळे गावातील काँग्रेस कार्यकर्ते आणि पदधिकारी यांनी शिवसेना पक्षात प्रवेश केला तर आज सकाळी अंबेनळी गावाने शिवनेरी या निवस्थानी संपुर्ण गावाने प्रवेश करत असतानाच बिरवाडी जिल्हा परिषद मतदार संघातील काँग्रेस पक्षाचा बालेकिला समजाला जाणार्या कुसगाव मोहल्ला गारपाटले तसेच सडेवाडी येथील शेकडो काँग्रेस कार्यकर्ते आणि पदाधिकारी यांनी शिवसेना कार्यप्रणाली वर विश्वास ठेवत शिवसेना पक्षात जाहिर प्रवेश केला आहे यावेळी कुसगाव मोहल्ला माधिल विद्यमान ग्रामपंचायत सदस्य बशीर अब्बास पठाण, ग्रामपंचायत माजी सरपंच नुरुद्दीन महामुद पठाण, विद्यमान ग्रामपंचायत सदस्या सिमा मुदुस्सर कोंडीवकर, यांच्या सह पन्नास ते साठ कार्यकत्यांनी तर गारपाटले येथील राजेश पवार, विकास विळास पवार, अशिष पवार, प्रविण रिकामे, काशीनाथ महाडिक, पांडुरंग कासार, अनिकेत धुमाळ सह तीस ते चालिस कार्यकर्त्यांनी आणि सडेवाडी येथिल महेश हिरवे, गणेश हरिचंद्र हिरवे , राघू लक्ष्मण कचरे, गणेश किसन खुटेकर यांच्या सह वीस ते पंचवीस कार्यकर्त्यांनी काँग्रेस पक्षाला रामराम ठोकत आमदार गोगावले यांच्या विकास कामांची घोडदौड पाहुन छोटे खानी पक्ष प्रवेश कार्यक्रमात कुसगाव मोहल्ला येथे प्रवेश केला.
यावेळी विधान सभा संपर्क प्रमुख विजय आप्पा सावंत, तालुका प्रमुख सुरेश महाडिक, महाड तालुका सह संपर्क प्रमुख इक्बाल चांदले, जिल्हा परिषद सदस्य संजय कचरे , माझी सभापती ममता गांगण , माजी पंचायत समिती सदस्य लक्ष्मण बुवा गरुड विधान सभा युवा सेना समन्वयक इम्रान पठाण, माझी सरपंच नुरुद्दीन पठाण, विद्यमान सदस्य बशीर पठाण, शिवसेना उप तालूका प्रमुख राजेश गोळे, विभाग प्रमुख दिलीप शिंदे युवासेना महाड तालुका अधिकारी राकेश मोरे , इत्यादी पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते
यावेळी बोळत असताना माजी सरपंच नुरुद्दीन पठाण यांनी भावनिक होवून आपल्या राजकिय .जिवणातील प्रवास सांगत आमदार गोगावले हे गोरगरिबांनचे खर्या अर्थाने कैवारी असून समाजकार हे आमदार गोगावले यांच्याकडुनच शिकावे त्यांच्या या समाजकारणाला सलाम करत आपण गावच्या विकासासाठी आज शिवसेना पक्षात प्रवेश करत असून यापुढे मरेपर्यंत आमदार गोगावले यांची साथ सोडणार नाही असे वचन दिले आहे
तर विद्यमान सदस्य आणी माजी सरपंच बशीर पठाण यांनी आज संपूर्ण तालुक्यात आमदार गोगावले यांची विकासाची मालिका पहता आणि आणी जिल्हापरिषद आणि पंचायत समिती सभापती हे शिवसेना पक्षाचेच आहेत त्यामुळे येणाऱ्या काळात गावचा विकास व्हावा याच हेतूने आम्ही आमदार गोगावले यांच्यावर विश्वास ठेवत गावच्या विकासासाठी शिवसेना पक्षात जाहिर प्रवेश करत असल्याचे सांगितले आहे
अनेक वर्ष आम्ही ज्या गोष्टीची वाट पाहत होतो त्यामध्ये यशस्वी झालो आहोत गारपाटले आणी कुसगाव मोहल्ला येथील काँगेस पक्षाचे कार्यकर्त गेली अनेक वर्ष काँग्रेस पक्षात कार्यरत होते परंतू आज त्यानी शिवसेना पक्षात प्रवेश केल्याने आम्ही यशस्वी झालो आहोत या ठिकाणी गेली अनेक वर्ष संघर्षात्मक वातावरण असायच परंतू खऱ्याअर्थाने संघर्ष संपला आहे त्यामुळे सर्व प्रवेश कर्त्यांचे मनापासून स्वागत करतो आणि या दुर्गम भागाचा जास्तीत जास्त विकास करण्याचे वचन देतो असे प्रवेशकत्यांना आश्र्वासित केल आहे
Post a Comment