संजय खांबेटे : म्हसळा
कोरोना रुग्णांमध्ये वाढ होत आसतानाच रायगड जिल्ह्या मध्ये आज बुधवार दिनांक ५ रोजी ७४९ कोरोना रुग्णांची वाढ झाली.यामध्ये तळा, सुधागड, श्रीवर्धन, म्हसळा आणि पोलादपूर या पाच तालुक्यांत आज एकही रुग्ण सापडला नसल्याचे सांगण्यात आले. तालुका निहाय आज सापडलेले नवीन रुग्ण पुढील प्रमाणे पनवेल मनपा ४७५, पनवेल ग्रामिण ८५, उरण १९, खालापूर २०, कर्जत २७, पेण २५, अलिबाग ४१, मुरुड ३, माणगाव ८, रोहा ११, महाड ३५ असे आज नव्याने ७४९ कोरोना रुग्ण सापडले आहेत, आज जिल्ह्यात ७६ रुग्ण बरे झाले असे रायगड जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधीकरण नियंत्रण कक्षाने प्रसिध्दी पत्रकांत म्हटले आहे.
Post a Comment