अलिबाग येथील कुलाबा किल्ला आणि सरसगड येथे अज्ञात व्यक्तींनी अनधिकृत मदार बांधली आहे. या अनधिकृत मदार त्वरित हटविण्याची मागणी सरखेल कान्होजी आंग्रे यांचे नववे वंशज रघुजीराजे आंग्रे यांनी केली आहे.
इतिहासाच्या पाऊलखुणा पुसण्याचे काम अनेक किल्ले आणि गडावर सुरू असून येथील जमीन हस्तगत करण्याचा डाव सुरू असल्याचा आरोप रघुजीराजे आंग्रे यांनी केला आहे. किल्ले रायगड मदार मोर्चा प्रकरणाबाबत छत्रपती संभाजीराजे यांनी पुरातत्व विभागाला पत्र दिल्यानंतर त्वरित येथील रंगरंगोटी हटवून ठिकाण पूर्ववत केले. तसेच सुरक्षा रक्षकही तैनात केले आहेत.
त्यानंतर अलिबाग येथील कुलाबा किल्ला आणि सरसगड या किल्ल्यांवरही अनधिकृत मदार बांधण्यात आल्याचे समोर आले आहे. कुलाबा किल्ला येथील तोफांच्या परिसरात ही मदार बांधण्यात आली आहे. या किल्ल्यात एक पुरातन दर्गा आहे. याबाबत कोणताही आक्षेप नाही. मात्र आता बांधण्यात आलेली मदार अनधिकृत असल्याने, ती त्वरित हटविण्याची मागणी रघुजीराजे आंग्रे यांनी पुरातत्व विभागाकडे निवेदनाद्वारे केली आहे.
Post a Comment